शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून 76 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी-महादेव चव्हाण सर
इंदापूर:-शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर आज दिनांक 14/3/2022 रोजी निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सुरवड गावाच्या परिसरातील ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करताना नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा.श्री. दादासो उत्तम घोगरे साहेब,मा.श्री.सुरेश बलभीम मेहेर साहेब मा. व्हाईस चेअरमन शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना अकलूज , श्री शिवाजी नामदेव कोरटकर, , श्री महादेव बळी कोरटकर, श्री पांडुरंग निवृत्ती जगताप ,श्री चांगदेव मुरलीधर घोगरे ,श्री महादेव दत्तू ढेरे, त्याच बरोबर निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी श्री किरण लक्ष्मण घोगरे साहेब श्री विकास रामचंद्र शिंदे साहेब, या सर्वांची उपस्थिती मध्ये 76 ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी केंद्राच्या डॉक्टर श्वेता शिंदे ,नर्स पूजा धांदे, तनुजा गायकवाड ,वॉर्डबॉय नितेश बेटे कर ,केंद्राचे प्रमुख श्री महादेव चव्हाण सर आणि संजय शेलार सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या