इंदापूर:-केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातील चर्चा सत्रात राज्यातील आघाडी सरकारवर टीका करताना तिरुपती बालाजी येथील न्हाव्यांची उपमा देऊन नाभिक समाजाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हा सकल नाभिक समाजाचा अवमान असून रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाची बिनशर्त माफी मागावी अन्यथा नाभिक समाज रस्त्यावर उतरून आपला रोष प्रगट करील असा संतापजनक इशारा समाजातील सर्वच थरातून देण्यात येत आहे.
दांनवेंच्या तथाकथित वक्तव्याने संपूर्ण नाभिक समाज दुखावला असून अशा प्रकारचा अवमान समाज कधीही खपवून घेणार नाही,वेळ पडल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त केला जाईल असे आज विविध नाभिक संघटनांद्वारे जाहीर करण्यात आले आहे,आशी माहीती मुकुंद (दादा) साळुंके
निरीक्षक इंदापूर तालुका नाभिक महामंडळ यांनी दिली
टिप्पण्या