इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात विकासाची गंगा वाहत असून तालुक्यातील वाडीवस्ती देखील विकासकामातून वंचित राहत नाही.राज्यमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून गोखळी गावाला देखील कोट्यावधिओ रुपयाचा विकास निधी मिळाला असून शुक्रवारी दि.१८ मार्च रोजी ७ कोटी ७५ लाख निधीच्या विविध विकास कामांचे भुमिपुजन तसेच आरोग्य उपकेंद्र उद्घाटन समारंभ, व जाहिर सभा संपंन्न होणार आहे अशी माहिती गोखळीचे उपसरपंच सचिन तरंगे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता गोखळी येथे हा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपंन्न होणार असून या कार्यक्रमास ग्रामस्तांसह राष्ट्रवादी काँग्रेस समर्थकांनी उपस्थित रहावे असं आवाहन ही उपसरपंच सचिन तरंगे यांनी केले आहे.या मंजूर कामामध्ये तरंगवाडी- गोखळी -कर्मयोगी कारखाना रस्त्यावरील पूल 75 लाख रुपये, तरंगवाडी-गोखळी- वडापुरी रस्ता करणे 2 कोटी, सार्वजनिक शौचालय 2 लाख 10 हजार रुपये, इंदापूर बारामती रोड ते चांदणे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे 15 लक्ष आदी कामांसह इतर कामांचा समावेश असल्याचे तरंगे यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रविण माने,जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले,पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन सपकळ, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्याध्यक्ष अतुल झगडे,सरपंच सौ.अलका बापू पोळ यांसह राष्ट्रवादी काँग्रेस सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत असंही तरंगे यांनी सांगितले आहे.
टिप्पण्या