इंदापूर:- व्यंकटेशनगर प्रभाग क्र. ५ येथे आरोग्य व अंगणवाडी सेविका, शिक्षिका, डॉक्टर यांचा महिला कोविड योद्धा पुरस्कार सन्मान सोहळा व होम मिनिस्टर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने १० मार्च रोजी इंदापूर मधील व्यंकटेशनगर प्रभाग क्र. ५ मध्ये महिला कोविड योद्धा व होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला इंदापूर शहरातील महिला, मुलींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन वसीम भाई बागवान व मित्र परिवाराच्या वतीने इंदापूर शहरात एक दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वसीमभाई बागवान म्हणाले की, होम मिनिस्टर कार्यक्रम घेणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. परंतु नेतृत्व, संघटन, कष्ट, चिकाटी, जिद्द या सगळ्यांमुळे यश या टिम पासून दूर जाऊ शकले नाही. या कार्यक्रमाचे नियोजन इतके चोख आणि देखने होतं की या कार्यक्रमाला गेल्यानंतर प्रत्येक महिलेला पुढच्या वर्षाची वाट पहावी अशेच वाटत होते.
यावेळी वसीम भाई बागवान म्हणाले की, होम मिनिस्टर उपक्रम गावोगावी होणे गरजेचे आहे. यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील महिला व मुलींच्या कला गुणांना वाव मिळेल. तसेच पुढच्या वर्षी जागतिक महिला दिना निमित्त यापेक्षा अधिक मोठा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे ही यावेळी म्हणाले. या होम मिनिस्टर कार्यक्रमाचे विजेत्या पुढील प्रमाणे :
प्रथम क्रमांक - वैशाली चव्हाण (पैठणी बक्षीस), द्वितीय क्रमांक - रोहिणी जाधव ( डिनरसेट बक्षीस), तृतीय क्रमांक - गुल्फाम काझी (मिक्सर बक्षीस), चतुर्थ क्रमांक- मरियम खातून (कुकरसेट बक्षीस)
यावेळी कष्टकरी होतकरू,गरीब व विधवा महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास मैत्रीण ग्रुपच्या अध्यक्षा अनुराधा गारटकर, शोभाताई भरणे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष उमाताई इंगुले, कार्याध्यक्ष स्मिता पवार, मालन पवार, माया चौधरी यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज बनसोडे व माधुरी चव्हाण यांनी केले तर आभार आयोजक वसीम भाई बागवान यांनी मानले.
टिप्पण्या