महाराष्ट्राला समर्पित होवून कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे. ती गरज स्थानिक विद्यार्थ्यी भरून काढतील -राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर:- विद्यार्थ्यांनी शिक्षण घेवून चांगल्या पदावर जावून महाराष्ट्रातील जनतेची सेवा करावी, असा संदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला महाराष्ट्राला समर्पित होवून कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे. ती गरज स्थानिक विद्यार्थ्यांना भरून काढता येईल. महाराष्ट्रात आज मोठ्या संख्येने असे अधिकारी आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून भविष्यात स्थानिक विद्यार्थीही काम करू शकतील. त्यांना शिक्षणातून मोठया प्रमाणात संधी आहे. नोकरी किंवा व्यवसाय करून महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे योगदान देता येईल. जिल्ह्यात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही यश संपादन केले आहे.आसे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले,ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये इंदापूर तालुक्यातील कु. प्रतीक्षा ज्ञानदेव वणवे, चेतन ढावरे, निलेश ओमसे, दीपाली धालपे, अशोक नरुटे, अनिकेत वाघ, शैलेश मोरे, प्राजक्ता श्रीनिवास देवकाते- घुले यांनी यश संपादन करत त्यांची पोलीस उपनिरीक्षक (psi) पदी निवड झाली याबद्दल आज राज्यमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या वेळी बोलत होते.
टिप्पण्या