सरडेवाडी टोल कर्मचारांचे धरणे आंदोलन काँग्रेसच्या माध्यस्तीने अखेर मागे-अध्यक्ष स्वप्निल सावंत
इंदापुर; टोल कर्मचारी व कंत्राटी कंपनीच्या विरोधातील 20 तारखेला चालू झालेले बेमुदत धरणे आंदोलन अखेर इंदापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या मद्यस्थिनी आज अखेर मिटले.
सविस्तर बातमी अशी की कर्मचाऱ्यांचे कंत्राट घेणारी नवीन कंपनी g & g empire india services pvt. Ldt मागील दहा दिवस पूर्वी कारभार स्वीकारला . त्या मधील जुने नव लोकांना कंपनीने कुठलीही नोटीस कुठलेही कारण न देता नवीन करार केला नाही व त्यांना कामावर रुजू होण्यास मज्जाव केला. कामावर परत घेण्यासाठी सर्व कर्मचारी इंदापूर तहसील कार्यालय समोर आंदोलनाला बसले होते.
काल पहिल्या दिवशी अॅड. राहुल माखरे, अनिल पवार , कैलास कदम,शकील सय्यद, प्रकाश पवार,सुनील कांबळे, समद भाई व बऱ्याच जणांनी आंदोलनासभेट देऊन पाठिंबा दिला . ऍड राहुल माखरे यांनी देखील टोल कंपनीशी संपर्क साधला .
इंदापूर तालुका कॉग्रेस चे अध्यक्ष स्वप्नील सावंत यांनी या आंदोलनाला भेट देत त्यांच्या सर्व सहकारी पध्दधिकाऱ्या सहित आंदोलकां बरोबरीने आंदोलनात ठिया मांडला . त्यांनी टोल प्रशासना बरोबर संपर्क साधला तसेच नवीन कंपनीच्या मालकांबरोबर सातत्याने संपर्क साधून दहा ते बारा वर्ष कामावर असलेले कामगारांवरील झालेला अन्यायाची कल्पना दिली व कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास भाग पाडले .
आज आंदोलनाच्या जागीच सहा कर्मचाऱ्यांची जोइनिंग लेटर देण्यात आली व राहिलेल्या 3 कर्मचारांचा प्रश्नही लवकर मार्गी लाव असे आश्वासन दिले.
या प्रसंगी स्वप्नील सावंत म्हणाले की सर्व सामान्यांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष कायमच राहिला असून येणार काळात देखील तालुक्यातील सर्व सामान्यांच्या प्रश्नसाठी काम करत राहील .
या वेळी तालुका काँग्रेस चे अध्यक्ष स्वप्निल सावंत कार्याध्यक्ष काकासो देवकर, उपाध्यक्ष बिभीषण लोखंडे , जिल्हा काँग्रेस सरचिटणीस जकिर भाई काझी , काँग्रेस शहर अध्यक्ष तानाजी भोंग , शहर कार्याध्यक्ष चमन भाई बागवान , निवास शेळके, तुषार चिंचकर, चेतन कोरटकर, संतोष शेंडे , उत्तम फाळके , सुरेश लोखंडे , मिलिंद साबळे आदी उपस्तीत होते .
टिप्पण्या