इंदापुर :तालुक्यातील निमसाखर, निरवांगी, शहाजीनगर , शेटफळ हवेली, इंदापूर अनेक ठिकाणी पुराने अतिशय भयंकर परिस्थिती झाली आहे. त्यानिमित्त शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष अँड.राजेंद्र काळे, पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे, इंदापूर तालुका प्रमुख नितीनराव शिंदे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिष्टमंडळ अनेक गावातील पूर परिस्थितीची पाहणी करत आहे . इंदापूर तालुक्यातील रेडणी गावातील ओड्यावरचा पुल पूर्ण वाहून गेला आहे आणि त्यामुळे अनेक गावातील नागरिकांचा वाड्या वस्तीचा संपर्क तुटला आहे. उपस्थित नागरिकांनी पाहणी करण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळात अशी माहिती दिली की , रात्री पाणी येवढे होते कि, ओढ्याच्या दोन्ही बाजूला अर्धा पाऊण किलोमीटर पाणी पसरले होते .ते भयंकर चित्र होते. अनेकांचे पिके मुळा सकट वाहून गेली आहे. शासनाने मदत जाहीर केले पण ते सरसकट मदत करावी अशी मागणी रेडणी येथील शेतकऱ्यानी केली .यावेळी उपस्थितांनी आपले मत व्यक्त केले
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या