इंदापुर:(दि. 28 ऑक्टोबर) – कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा 2020-21 चा गाळप हंगाम सुरळीत चालू झालेला असून कारखान्याकडे ऊसतोडणी होवून येणा-या ऊसाची तोडणी व्यवस्थीत होणेसाठी व अतिवष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची कारखाना कार्यक्षेञातील मौजे सरडेवाडी येथे कर्मयोगी कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक श्री. बाजीराव जी. सुतार, मुख्य शेतकी अधिकारी श्री. एस.जी. कदम व सिव्हील इंजिनिअर श्री. एस.बी. शिंदे यांनी कारखान्याचे मा.संचालक श्री. वामनराव पंढरीनाथ सरडे यांचे प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन पाहणी केली.
यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सह साखर कारखान्याचे कर्तव्य दक्ष व धडाकेबाज कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतार यांनी कारखान्याचे ऊस उत्पादकांचे ऊस वजनाचे नुकसान होवू नये तसेच कारखान्याची रिकव्हरी वाढावी यासाठी ऊसतोडणी करणा-या मजुरांना ऊस तोड
जमीनीलगत करावी, स्वच्छ व पाचटविरहित ऊस गळीतास आणावा, तसेच वाहन चालकाने फडातून तोडणी केलेला ऊस घेवून येताना रस्सीने घटट्र बांधलेला आहे का याची पाहणी करावी. टेलरला मागील बाजूस कापडी रिफलेक्टरचा वापर करावा व विनाअपघात वाहन कारखाना साईटवरती हजर होईल याची दक्षता घ्यावी ऊसाबरोबर कोणतेही फॉरेन मटेरियल येणार नाही याची दक्षता घ्यावी, कोरोना संदर्भात ऊसतोड मजूर, वाहतुक यंञणा या सर्वांनी काळजी घ्यावी अशा सुचना केल्या.
यावेळी मौजे सरडेवाडी येथील कारखान्याचे शेतकरी सभासद श्री. वामनराव पंढरीनाथ सरडे व इतर हिंगणगांव येथील ऊस उत्पादक यांनी त्यांचे व इतर प्लॉटची पाहणी केल्याबद्दल व सुचना दिलेबद्दल कारखान्याचे अधिकारीवर्गाचे आभार मानले
टिप्पण्या