इंदापुरः तालुक्यातील काटी-वडापुरी गटातील विकासकामांसाठी अभिजित तांबिले यांनी दिले दतात्रय भरणे यांना निवेदन, इंदापूर तालुक्यातील काटी वडापुरी जिल्हा परिषद गटातील रस्त्यांची, अतिवृष्टीमुळे दुरुस्ती करणे गरजेचे आहे. याच
रस्त्यांवरील पूल वाहन गेल्याने
अद्ययावत पूल निर्माण करावेत.यासाठी निधी मंजूर करावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे सदस्य अभिजित तांबिले यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
यांना दिले आहे.पुणे येथे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मागण्यांचे निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले.
दत्तात्रय भरणे यांची पुणे येथे भेट घेऊन वरील मागण्यांचे निवेदन दिले आहे. तसेच मतदारसंघातील अडचणी, समस्याबाबत चर्चा केली.यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील
सातही जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये
जे नुकसान झाले आहे. सर्व रस्ते दुरुस्त केले जातील. पुलांची उभारणी रस्त्यांवर करण्यात येईल अशीग्वाही राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. काटी - वडापुरी गटातील,रेडा, रेडणी, वरकुटे, हिंगणगाव,अवसरी, पिटकेश्वर, सरडेवाडी
या भागातील रस्ते व ओढ्यावरील
पुल दुरुस्ती करावेत, अशी मागणी सदस्य तांबिले यांनी केली आहे.
टिप्पण्या