इंदापुर: तालुक्यातील जनसामान्यांचे नेतृत्व मा. राजवर्धन पाटील यांनी आज बुधवार दिनांक 28 ऑक्टोबर 2020 यांना भिगवण स्टेशन (सोनटक्के वस्ती) येथील श्री. संतोष माणिकराव सोनटक्के यांच्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याचे समजले, त्यांच्या अंत्यविधीसाठी गेले असता, अंत्यविधीच्या ठिकाणापासून अलीकडे ओढ्याला मोठया प्रमाणावर पाणी वाहत होते
.कोणतेही दुचाकी अथवा चार चाकी वाहन तेथून घेऊन जाणे शक्य नव्हते. सतत वाहणाऱ्या पाण्यामुळे ओढ्यावरील पुलावरती खड्डे पडले होते . ट्रॅक्टर ची पुढची चाके अर्ध्याच्या वरती पाण्याखाली जात होती. पण इच्छा तेथे मार्ग या उक्तीप्रमाणे आपल्या कार्यकर्त्यांवरील दुःखाच्या क्षणी धावून जात
ट्रॅक्टर मधून पलीकडे जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला व कुटुंबीयांचे सांत्वन केले. कै.माणिकराव सोनटक्के यांचे मृत्यूसमयी वय 70 वर्ष होते. वडिलांच्या अचानक जाण्यामुळे श्री .संतोष सोनटक्के यांच्या कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले होते.
या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची साठी परमेश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना करुन मा.पाटील यांनी त्यांना *भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली* . यावेळी भिगवनचे युवा कार्यकर्ते व मार्केट कमिटीची माजी उपसभापती पराग जाधव उपस्थित होते
टिप्पण्या