इंदापुर: ईद ए मिलाद निमित्त H.K.G.N. ग्रुप व इंदापूर शहर बागवान जमात आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवा नेते मा. राजवर्धन पाटील, संचालक नीरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजवर्धन पाटील म्हणाले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.. आणि H K G N group आणि बागवान जमात इंदापूर शहर हे अत्यंत श्रेष्ठ व उत्कृष्ट काम करत आहेत त्यांचा सर्व लोकांनी आदर्श घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले. सर्वांनी या शिबिरामध्ये जास्तीत जास्त रक्तदान करावे असे आव्हान त्यांनी या वेळी केले.
यावेळी नगराध्यक्षाअंकिता मुकुंद शहा,
इंदापूर भाजपा अध्यक्ष adv. शरद जामदार, इंदापूर शहर भाजपा अध्यक्ष शकील भाई सय्यद, गटनेते कैलास कदम, डॉ. अविनाश पाणबुडे, व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या