मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी

म्हसवड ते टेंभुर्णी रस्ता अपुर्ण एम्.एस्.आर.डी.सी. चे आधिकारी कंपनीस / कॉन्ट्रॅक्टर ला पाठीशी घालतात. श्री.मधुकर (आण्णा) देशमुख


टेंभूर्णी  म्हसवड ते टेंभुर्णी रस्ता अपुर्ण व रखडलेल्या कामा संदर्भात श्री.मधुकर (आण्णा) देशमुख
शिवसेना तालुका प्रमुख माढा
जि.सोलापूर यांच्या  वतीने निवेदन दिले असून
म्हसवड ते टेंभुर्णी हा रस्ता एम्.एस्.आर.डी.सी.


अंतर्गत या मार्गाचे काम चौपदरी करण सिमेंट काँक्रिट मध्ये करण्यास गेल्या 3
वर्षापासून सुरू केले आहे ते अद्याप अपुर्ण आहे. रस्त्यावर मोठे मोठे खड्डे खोदुन
ठेवलेले आहेत. या कामाचे टेंडर ज्या कंपनीस/कॉन्ट्रॅक्टरला दिले आहे ते
याकामात दिरंगाई करीत आहेत, एम्.एस्.आर.डी.सी. चे आधिकारी या
कंपनीस / कॉन्ट्रॅक्टर ला पाठीशी घालत आहेत. 


असे मत श्री.मधुकर (आण्णा) देशमुख
यांनी निवेदनात म्हटले आहे,
सध्याची परिस्थिती अकलुज ते
टेंभुर्णी हा मार्ग कामासाठी उखडुन टाकून 2 वर्षे होऊन गेली कसा बसा खडयातुन
मार्ग काडीत अकलुज ते टेंभुर्णी वाहतुक चालु होती पण अता अतिवृष्टीमुळे सर्व
खड्डे गाळ व पाण्याने भरल्यामुळे संगम ते शेवरे 


पुलापलिकडे 7 फुट खोल रस्ता
खोदून ठेवला आहे , आणि या खडयात गाळ व पाणी साठवून राहिल्याने वाहतुक
बंद आहे सदर खडयाच्या अलिकडे व पलिकडे "रस्ता बंद आहे" असा फलक या
कपंनीने व आपल्या विभागाने लावला नाही सदर खडयात अनेक चार चाकी
गाडया रुतुन नंतर ट्रैक्टर च्या सहयाने बाहेर काढण्यात आल्या आशा शेकडो चार
चाकी व दुचाकी गाड्या आणि इतर वाहने खराब झाली व प्रवास करणा-यांना
दुखापत मोठया प्रमाणात झाल्या आहे. सध्या या मार्गाची वाहतुक इंदापूर
तालुक्यातुन जात आहे  अकलुज टेंभुर्णी हा मार्ग ईतका महत्वाचा मार्ग आहे
की दवाखाने सर्व सोयी असणारे अकलुज येथे आहेत त्यामुळे माढा व करमाळा
या 2 तालुक्यातील सिरियस पेशंटला अकलुज येथील हॉस्पीटल जवळचा पर्याय
आहे. आपल्या रखडलेल्या कामामुळे कितेकजणाचा अकलुजला वेळेत न
पोहचल्याने प्राण गेला. शिवाय अकलुज येथे असणाऱ्या शिक्षण संस्था आणि टेंभुर्णी
अकलुज व्यापारी दळण वळण असल्याने व्यापारी मंडळीचे नुकसान होत आहे.
त्यातच अता साखर कारखाने चालु झालेत माळशिरस तालुकयात असणारे
पांडूरंग साखर कारखाना, श्रीपुर "दि.सासवड
फॅक्टरी माळीनगर, सहकार महर्षि सहकारी साखर कारखाना,यशवंतनगर तसेच
माळशिरस तालुक्यातुन माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर
कारखाना, पिपंळनेर व भैरवनाथ शुगर, आलेगांव व इतर साखर कारखान्यास ऊस
वाहतुक होत असते या बंद मार्गामुळे ऊस वाहतुक करणे अवघड झाले आहे.
वरील सर्व बाबीमुळे होणारी हानी व गौरसोय या मुळे सबंधीत कंपनी व कॉन्ट्रैक्टर
माळी शुगर आणि एम्.एस्.आर.डी.सी. हे काम पहाणारे जबाबदार अधिकारी यांचेवर तात्काळ
कारवाई करण्यात यावी व या मार्गाचे काम पुर्ण करावे.


अन्यथा येत्या 15 दिवसात शिवसेना माढा तालुक्याच्या वतीने टेंभुर्णी ते
अकलुज या मार्गावर रस्ता रोको अंदोलन करणार होणाऱ्या परिणामास कंपनी व
काँट्रॅक्टर आणि एम्.एस्.आर.डी.सी. चे अधिकारी जबबादार राहतील.असे ही निवेदनात म्हटले आहे, या विषयाचे निवेदन
मा.मुख्यमंत्री उध्दवजी बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्य, मुंबई
मा.ना.श्री.एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
मंत्री, महाराष्ट्र राज्य
मा.जिल्हाधिकारी सोलापूर
मा.पोलिस अधिकक्षक सोलापूर
शिवसेना संपर्कप्रमुख सोलापूर जिल्हा
शिवसेना जिल्हा प्रमुख (माढा विभाग)यांना पाठवण्यात आले आहेत आशी माहिती श्री.मधुकर (आण्णा) देशमुख
शिवसेना तालुका प्रमुख माढा
जि.सोलापूर यांनी आमच्या शी बोलताना दि

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...