इंदापुर: जनसामान्यांचे नेतृत्व मा. राजवर्धनदादा पाटील यांनी आज गुरुवार दिनांक 29ऑक्टोबर 2020 रोजी इंदापुर तालुक्यातील कौठळी येथील विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन श्री. भारत मारकड यांचे चिरंजीव श्री.गणेश भारत मारकड यांच्या विवाहाप्रसंगी कौठळी येथे जात असताना , रस्ता पावसाच्या पाण्यामुळे अत्यंत खराब झाल्याने गाडी विवाहस्थळापर्यंत घेऊन जाणे शक्य नसल्यामुळे मा.राजवर्धन पाटील यांनी
दुचाकीवरून प्रवास करून विवाह समारंभास उपस्थित राहून वधू-वरांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.विवाह सोहळा अत्यंत साधे पद्धतीने व कोविड विषयक नियमांचे पालन करून केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. या प्रसंगातून राजवर्धन पाटील हे प्रतेकाच्या सुख दुःखात सामिल होतात, म्हणून त्यांना जनसामान्यांचा नेता गोरगरीब जनतेचा कैवारी म्हटले जाते, सर्वसमावेशकपणा, जनसामान्यात असणारे स्थान व त्यांच्याशी असलेले नाते किती घट्ट आहे हे दिसून येते,
टिप्पण्या