मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज,शिवसृष्टी न्युज


इंदापूर:प्रतिनिधी दि. 25/10/2020
                 इंदापूर:तालुक्यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती एकाच वेळी निर्माण झाल्याने  शेतीपिकांचे व घरांचे राज्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आहे. मात्र‌ सध्या नुकसानग्रस्त पिकांचे व घरांचे सरसकट पंचनामे केले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. पंचनाम्याअभावी एकही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक वंचित  नये, त्याकरिता शासनाने नुकसानग्रस्त सर्व पिकांचे व‌ घरांचे सरसकट पंचनामे पुर्ण करावेत, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.25) केली आहे.
                  ते पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात व जिल्ह्यामध्ये दि. 14 व 15 ऑक्टो. रोजी अतिवृष्टी होऊन निरा व भीमा नदीला महापूर आला. त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, कांदा, कडवळ आदी पिके पुर्णपणे वाया गेली. तसेच फळबागा व ऊस पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. अजुनही शेतात पाणी आहे. त्यामुळे कधी नव्हे एवढा शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्याचबरोबर गावोगावच्या अनेक घरांची पुरामुळे व अतिवृष्टीने हानी झाली आहे. सध्या मात्र नुकसान झालेली खरीप पिके, ऊस , फळबागा तसेच घरांचे कालबाह्य नियम पुढे करून अनेक ठिकाणी सरसकट पंचनामे होत नसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणे पासून अनेक शेतकरी व नागरिक वंचित राहण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
           इंदापूर तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त सर्व पिकांचे व घरांचे सरसकट पंचनामे करणे गरजेचे आहे. पंचनाम्याअभावी एकही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक वंचित राहणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. तात्काळ सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. आम्ही सत्तेवर असताना नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकरी वर्गाला वेळोवेळी मोठी आर्थिक मदत केली आहे, याचा अनुभव तालुक्यातील शेतकऱ्यांना आहे, असेही यावेळी पाटील यांनी नमूद केले.
          ‌शासनाने बागायती पिकासाठी एकरी रु. ४ हजार व फळबागांसाठी 10 हजार एवढी तुटपुंजी मदत जाहीर केले आहे. सदरची मदत देतानाही नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे केले जात नाहीत, ही खेदाची बाब असल्याचे याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी संगितले.
_______________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...