इंदापूर : प्रतिनिधी
संपूर्ण पुणे जिल्ह्यात गाजत असलेले निमगांव-केतकी (ता. इंदापूर) येथील कोविड सेंटरमधील कोरोना रुग्णांच्या उपचाराकरीता वापरण्यात येणाऱ्या फॅबीफ्लू नावाच्या गोळ्या तेथील कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी लंपास केलेल्या प्रकरणी वरीष्ठांकडे तक्रार दाखल होवूनही संबंधित डॉक्टरांवर होणार्या टाळाटाळ प्रकरणी उपोषणकर्ते यांनी काल दि.२३ रोजी केलेल्या आरोपांची,झालेल्या प्रकाराची लक्ष्मी वैभव न्युज व शिवसृष्टी न्युज ने या प्रकरणी सडेतोडपणे बातमी प्रसिद्ध करण्यात आली.
या वृत्ताची दखल घेत,झालेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेवून पुणे जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय पुणे यांनी याप्रकरणी चौकशीचे अहवाल प्राप्त होईपर्यंत या प्रकरणातील संबंधित प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डॉ.मिलिंद खाडे व आरबीएसके वैद्यकिय अधिकारी डॉ.सुहास डोंगरे यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
ही आरोग्य विभागाची इंदापूर विभागातील ही सर्वात मोठी आणि पहिलीच कारवाई आहे.
यामुळे बहुजन मुक्ती पार्टीने करण्यात आलेल्या संबंधित दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीला यश आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी येथील कोवीड केअर सेंटरमधून दि.०९ सप्टेंबर रोजी रुग्णांसाठी अत्यावश्यक व दुर्मिळ औषधे (फॅबीफ्ल्यू) गोळ्यांचा काही साठा चोरुन नेण्यात आला होता. हे प्रकरण प्रशासकीय अधिकारी,संबंधित डॉक्टर यांनी हे प्रकरण संगनमताने दाबून टाकल्याने संबंधित दोषींवर कारवाईस टाळाटाळ होत होती.अश्यातच तेथील कोविड सेंटरमध्येही कार्यरत असलेल्या परिचारिकेच्या फोन संभाषणाच्या व्हायरल झालेल्या अॉडीओ क्लिप मुळे हे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सबंधित दोषींवर कारवाई व्हावी यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे इंदापूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब भोंग व यांसह इतर कार्यकर्त्यांनी दि.२१अॉक्टोंबर पासून नवीन प्रशासकीय भवनसमोर आमरण उपोषण पुकारले. काल ठरवण्यात आलेल्या आंदोलनाच्या नवीन दिशेमुळे आज दि.२३ अॉक्टोंबर रोजी बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव अॅड.राहुल मखरे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले.
निमगांव केतकी येथील कोवीड केअर सेंटरमध्ये झालेल्या पाच व्यक्तींच्या मृत्यूस संबंधित अधिकारी जबाबदार आहेत.त्यांनी रुग्णांसाठी अत्यावश्यक व दुर्मिळ औषधे असलेल्या फॅबीफ्लू गोळ्यांचा काही साठा चोरुन नेण्यात आला. ज्यांनी कोणी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणत शेकडो कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यातचं ठिया मांडण्यात आला.जर तुम्ही कारवाई करणार नसाल तर आम्ही स्वत: जेलभरो आंदोलन करत स्वत:हून अटक होतो असा पवित्रा घेतला.
या सर्व प्रकारानंतर आरोग्य प्रशासनाने तातडीने पावले उचलत जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय,पुणे यांच्याशी भ्रणध्वनीवरुन संपर्क साधून वरिष्ठांनी दिलेल्या सुचनेनुसार याकामी चौकशी समिती नेमून सदर समितीचा चौकशी अहवाल येईपर्यंत संबंधित वरील दोन डॉक्टरांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
या कारवाईने बहुजन मुक्ती पार्टीच्या आमरण उपोषणाला यश आल्याची चर्चा शहर व तालुक्यात नागरीक व्यक्त करत आहेत.
टिप्पण्या