जनसामान्यांचे नेतृत्व मा.राजवर्धन पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन
इंदापुर: जनसामान्यांचे नेतृत्व मा.राजवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते आज शुक्रवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२० रोजी रक्तदान शिबिराचे जंक्शन येथे उद्घाटन संपन्न झाले. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. गरजूंना आवश्यक वेळी रक्त उपलब्ध होत नाही. अशा वेळी रुग्णाला जीवही गमवावा लागतो. अशी वेळ येऊ नये, यासाठी रक्तसाठा आवश्यक असतो. त्यादृष्टीने जंक्शन येथे मा. श्री सुरेश भास्कर चौधरी व त्यांच्या काळेश्वरी मित्रमंडळ आनंदनगर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजित केले आहे. आयोजकांनी उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल दादांनी त्यांचे कौतुक करुन सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या शिबिरात मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टंन्सिग इत्यादी आरोग्यविषयक खबरदारी घेतली गेली आहे तरी तरुण मित्रमंडळींनी रक्तदानासाठी पुढे यावे असे दादांनी सर्वांना याप्रसंगी आव्हान केले.
टिप्पण्या