मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज


इंदापूर:प्रतिनिधी 
          इंदापूर तालुक्यात व जिल्ह्यामध्ये दि. 14 व 15 ऑक्टो. रोजी अतिवृष्टी होऊन आठ दिवस झाले तरीही शासनाने आपत्तीग्रस्तांना कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. त्यामुळे शासनाने विलंब न लावता शेतक-यांना व पुरग्रस्तांना  25 हजार रुपयांची तातडीची मदत द्यावी, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि. 21) इंदापूर येथे केली.
               इंदापूर तालुक्यात चालु पावसाळ्यात  आजपर्यंत विक्रमी 275 टक्के (एकुण 1450 मी.मी.) पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, कांदा, कडवळ आदी पिके पुर्णपणे वाया गेली आहेत. फळबागा व ऊस पिकांचेही मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. अजुनही शेतात पाणी आहे. त्यामुळे कधी नव्हे असा शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे तातडीची मदत म्हणून शेतक-यांना आता  तात्काळ 25 हजार रू. प्रति हेक्टरी याप्रमाणे  आर्थिक मदत शासनाने करावी. त्यानंतर पिकांचे पंचनामे पुर्ण झालेवर फळबांगांना व ऊस पिकांना प्रति हेक्टरी रू. 50 हजार निकषाप्रमाणे उर्वरित देय रक्कम रू.25 हजारची आर्थिक मदत  शेतकऱ्यांना द्यावी, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमुद केले. 
      ते पुढे म्हणाले, नीरा व भिमा नदीला पुर आल्याने तसेच गावोगावच्या ओढयांचे रूपांतर नदीत झाल्याने अनेक घरांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे अशा पुरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत म्हणून रू. 25 हजाराची मदत द्यावी. घरांचे पंचनामे झाल्यानंतर कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे नुकसानीच्या प्रमाणात रू. 1 लाख, रू. 2 लाख याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम अदा करावी. गावोगावची तसेच इंदापूर शहरातील दुकाने तसेच हॉस्पिटल्समधील उपकरणे यांचे नुकसान झाल्याने त्यांनाही आर्थिक सहाय्य करण्यात यावे.शासनाने नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत, एकही शेतकरी अथवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहू नये.
      तसेच नीरा व भिमा नदीवरील बहुतेक बंधा-यांचे पुराने दोन्ही बाजूकडील भराव वाहून जाणे, ढापे वाकडे होणे, भिंतींना चिरा जाणे आदी प्रकारचे नुकसान झाले आहे. दि.15 ऑक्टो.पासून बंधा-यांमध्ये पाणी अडविले जाते. त्यामुळे हानी झालेल्या बंधा-यांची तात्काळ दुरूस्ती करून पुर्ण क्षमतेने पाणी अडविणेत यावे. भीमा व नीरा नदीचे पात्र डिसेंबर महिन्यात कोरडे पडते. जर सध्या पाणी अडविले नाही तर मात्र निरा व भिमा नदी काठच्या शेतकऱ्यांची पिके 15 जानेवारीपासून पाण्याअभावी जळुन जाऊन, शेतकरी उध्वस्त होईल, असा स्पष्ट  इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.
         सध्याच्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांची  खरीप व इतर पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यामुळे चालू रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी शेतक-यांना प्रति हेक्टरी रू.15 हजार रूपयांचे अनुदान शासनाने देण्याची गरज आहे, असे मतही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
      राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दि. 19 रोजी इंदापूर तालुक्याची पुर परिस्थितीची पाहणी केली. ते केंद्र शासनाकडून शेतक-यांना भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र पूरग्रस्तांना मदत करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
      इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे बांधकाम खात्याचे मंत्री आहेत, असे असताना त्यांच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यातील गावोगावच्या  रस्त्यांची वाट लागली आहे. तसेच अडचणीतील शेतकरी व नागरीकांना शासनाची तात्काळ मदत मिळवून देणेचे काम हे लोकप्रतिनीधीचे असते, मात्र तालुक्याचे लोकप्रतिनीधी यामध्ये निष्क्रिय व अपयशी ठरले आहेत, अशी टिका यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली. 
**************************************
सोलापुरात चेक वाटप, मग इंदापूरात का नाही? - हर्षवर्धन पाटील. -----------------------------------------------इंदापूरचे लोकप्रतिनिधी हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, तिथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अतिवृष्टीने घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाच्या वतीने चेकचे वाटप करण्यात आले.आपले लोकप्रतिनिधी सोलापूर येथे शासनाची तात्काळ मदत म्हणून जनतेला चेक वाटतात, मात्र इंदापूर तालुक्यातील जनतेला वाऱ्यावर सोडत आहेत. तसेच सोलापूरच्या तुलनेत इंदापुरात जास्त नुकसान झाले आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी इंदापूर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करणे गरजेचे होते, असे स्पष्ट मतही हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले._____________________________
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते