इंदापूर:जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस जागर लोककलेचा वसा स्त्री शक्तीचा* कार्यक्रम नऊ दिवस नवमहानायिकांचा एकपात्री प्रयोगाद्वारे जागर विविध भागातील संस्कृति लोकगीताद्वारे सादरीकरण@ *फेसबुक लाईव्ह कार्यक्रम दिनांक 17 ऑक्टबर ते 25 ऑक्टोबर 2020 रोजी दररोज दुपारी २ ते ४ वाजता महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड च्या अधिकृत जिजाऊ-ब्रिगेड-महाराष्ट्र या पेज वर कार्यक्रम पहावा असे आवाहन केले आहे*
कोरोना लाॅकडाउन काळात महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेड ने ऑनलाइन आंतरराष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले होते त्या कार्यक्रमास फेसबुकवर 3 लाख पेक्षा जास्त लोकांनी पेज ला बघितले होते.ऑनलाइन कार्यक्रमांमुळे वेळ व श्रम व पैशांची मोठी बचत होते तसेच अनेकांपर्यंत विचारधारा पोहचवणे शक्य होते म्हणून मराठा सेवा संघ महाराष्ट्र जिजाऊ ब्रिगेडतर्फे नवरात्रोत्सव निमित्त नऊ दिवस भरगच्च प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे.महानायिकांच्या जीवनावर एकपात्री
नाट्यछटेद्वारे प्रकाशज्योत टाकला जाईल.महिला संस्कृति जपण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातील महिला लोकगीते सादरीकरण करणार आहेत.अनिष्ट रुढी परंपरा,अंधश्रद्धा,महिला शक्ती यासह विविध विषयांवर ख्यातमान वक्तयांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान आयोजित केले आहे.सर्वांनी मोठ्या संख्येने कार्यक्रम पहावा...नवरात्र महोत्सवानिमित्त महाराष्ट्रभरातील विविध सांस्कृतिक ल दिवसनिष्ठ रुढी परंपरा,अंधश्रद्धा निर्मूलनपर तसेच स्री शक्तीचे दर्शन या विषयांवर व्याख्यानमालेचे सह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान ऑनलाइन होणाऱ्या कार्यक्रमाचे घटस्थापनेच्या दिवशी *शनिवार दिनांक 17 आॅक्टो.2020 रोजी* दुपारी 2 ते 4 वाजता जिजाऊ ब्रिगेड मार्गदर्शक आमदार रेखाताई खेडेकर यांच्या हस्ते उद्घाटन होईल त्यानंतर *सांगली* जिल्हा *राजमाता जिजाऊ* यांच्या जीवनावर आधारीत एकपात्री प्रयोग तसेच मुलींचा गरबा नृत्य सादर करतील. *रविवार दिनांक 18 आॅक्टोंबर 2020 रोजी* ठीक दुपारी 2 ते 4 वाजता *जिजाऊ ब्रिगेड पुणे* यांच्या वतीने *माता रमाई आंबेडकर* यांच्या जीवनावर आधारीत *मी रमाई बोलते* एकपात्री सादरीकरण कु.विश्वबाला गटकुळ यांनी केले आहे, पारंपारिक संस्कृती जपण्यासाठी जात्याच्यावरच्या ओव्या, लोकगीत सादर करण्यात आले आहे. *कार्यक्रम यशस्वितेसाठी जिजाऊ ब्रिगेड पुणे येथे जिल्हा अध्यक्ष प्रा.जयश्री भास्कर गटकुळ ,जिल्हाध्यक्ष जयश्री खबाले , इंदापूर तालुकाध्यक्ष राधिका शेळके, जिल्हा उपाध्यक्ष विश्वबाला गटकुळ , शकुंतला गटकुळ, प्रा. रेखा देवकर , वैशाली गटकुळ , सारिका गोफणे , संघमित्रा भोसले , प्रांजली गटकुळ,अश्विनी पवार,छाया सुर्यवंशी, शिवानी गटकुळ आदी पदाधिकारी यांनी खूप परीश्रम घेतले* *सोमवार दिनांक 19 आॅक्टो.2020* रोजी दुपारी 2 ते 4 वाजता *नाशिक* जिजाऊ ब्रिगेड प्रथम स्त्री शिक्षिका *सावित्रीबाई फुले* यांच्या जीवनावर आधारीत एकपात्री सादरीकरण करतील *मंगळवार दिनांक 20 आॅक्टो.2020* रोजी दुपारी 2 ते 4 वाजता *रत्नागिरी* जिजाऊ ब्रिगेड *अहिल्याबाई होळकर* यांच्या जीवनावर आधारीत एकपात्री सादरीकरण करतील. *बुधवार दिनांक 21 आॅक्टो.2020* रोजी दुपारी 2 ते 4 वाजता *सोलापूर* जिजाऊ ब्रिगेड भारतातील प्रथम स्त्री संपादक *तानूबाई बिर्जे* यांच्या जीवनावर आधारीत एकपात्री सादरीकरण करतील. *गुरूवार दिनांक 22आॅक्टो.2020* रोजी दुपारी 2 ते 4 वाजता *बुलढाणा* जिजाऊ ब्रिगेड तर्फे *महाराणी ताराराणी* यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग होईल. *शुक्रवार दिनांक 23आॅक्टो.2020* रोजी दुपारी 2 ते 4 वाजता *चंद्रपूर* जिजाऊ ब्रिगेड तर्फे *ताराबाई शिंदे* यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग होईल. *शनिवार दिनांक 24 आॅक्टो.2020* रोजी दुपारी 2 ते 4 वाजता
*हिंगोली* जिजाऊ ब्रिगेड तर्फे प्रथम मुस्लीम स्त्री शिक्षिका *फातेमाबी शेख* यांच्या जीवनावर आधारीत एकपात्री प्रयोग होईल. *रविवार दिनांक 25 आॅक्टो.2020* रोजी दुपारी 2 ते 4 वाजता *अमरावती* जिजाऊ ब्रिगेड *मुक्ता साळवे* यांच्या जीवनावर एकपात्री प्रयोग सादरीकरण होईल. समारोपीय मार्गदर्शन मराठा सेवा संघाचे संस्थापक अँड.पुरुषोत्तम खेडेकर यांचे समारोपीय मार्गदर्शन होईल.
टिप्पण्या