अनावश्यक खर्चाला फाटा देत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने हमीदभाई आतार यांचा वाढदिवस साजरा
इंदापुर:गेली अनेक महीने कोरोना ने आपल्या देशात थैमान घातले आहे, हा महाभयंकर व्हायरस मुळे अनेक जनांचे बळी घेतले आहेत,तेही केवळ काळजी न घेतल्या मुळे,मास्कचा व सॅनिटायझर चा वेळोवेळी योग्य वापर न केल्यामुळे व इतरांच्या चुकांमुळे या भयानक प्रकाराला बरेच निरापराध लोक बळी पडले आहेत,आसे मत हमीदभाई आतार यांनी व्यक्त केले,
कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन वाढदिवसाला होणारा हार,फेटा, केक, फटाके व नाहक गर्दी, इतर अनावश्यक खर्च हमीदभाई आतार यांनी टाळून इंदापुर येथील बसस्थानक परिसरात येणा-या व जाणा-या प्रवाशांना सॅनेटायझर आणि मास्क वाटप करुन सामाजिक संदेश दिला आहे.
या वाढदिवसासाठी होणा-या वायफळ इतर खर्च टाळून त्यांनी हे मास्क आणि सॅनेटायझर देण्याचे ठरविले. यांच्या या निर्णयामुळे वाढदिवसादिनी त्यांनी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. इंदापुर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा यांच्या हस्ते इतर ठिकाणाहून येणा-या अनेक प्रवाशांचा कोरोना पासुन बचाव करण्यासाठी मास्क आणि सॅनेटायझर प्राथमिक स्वरूपात वाटप केले.
लहान मुलांची व जेष्ठ नागरिक यांची रोग प्रतिकारक क्षमता कमी असते त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे असं मत मुकुंद शहा व्यक्त केले.
कोणी बिगर मास्कचा दिसला की त्यांना मास्कचे वाटप करून मास्क का वापरावे हे समजून सांगण्यात आले,
अनेकजन कसेही फिरतात, त्यांना या रोगाचे दुष्परिणाम माहीत नाही. त्यामुळे आम्ही मास्क आणि सॅनेटायझरचे वाटप केले असल्याचे सामाजिक कार्यात अग्रेसर आसणारे आमचे जिवलग मित्र हमीदभाई आतार यांनी सांगितले.
या वेळी वंचित बहुजन आघाडी चे इंदापुर शहराध्यक्ष हणमंतराव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते,माऊली नाचण, शिवसृष्टी न्युज चे संपादक धनंजय कळमकर, पत्रकार काकासाहेब मांढरे, पत्रकार कैलास(भाऊ) पवार, दिपक खिलारे, जितेंद्र जाधव, इमतीयाज मुलाणी,इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार सोशल डिस्टंनस पाळून सॅनिटायझर व मास्कचा वापर करून पार पडला आहे, या कार्यक्रमाचे आभार माऊली नाचण यांनी मानले,
टिप्पण्या