मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

कोरोनाचा मृत्यूदर रोखण्यात आमदारांना अपयश, नाकर्तेपणामुळे तालुक्यात कोरोनाचा उद्रेक 
भाजपकडून इंदापूर तालुक्याच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीचा निषेध:अॅड. शरद जामदार
       
इंदापूर:प्रतिनिधी दि.8/9/20
                 इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले निष्क्रिय मंत्र्याच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यात सध्या कोरोनाचा उद्रेक झाला आहे. कोरोना रुग्णांसाठी तालुक्यात अपु-या सोयी सुविधा असल्यामुळे 50 पेक्षा जास्त रूग्णांचे बळी गेले आहेत.आता स्वतःचा निष्क्रियपणा लपविण्यासाठी, जतनेला स्वतःची काळजी स्वतः घ्या असे हे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. त्यामुळे  कोरोनासंदर्भात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेल्या इंदापूर तालुक्याच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीचा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.8) प्रसिद्धीपत्रक काढून निषेध व्यक्त केला.
            भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार, जेष्ठ नेते मारुती वणवे, पुणे जिल्हा सचिव तानाजी थोरात, किसान मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक माऊली चवरे, इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष राम आसबे यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
                कोरोनाची सुरवात मार्च मध्ये झालेली असताना, आजपर्यंत तुम्ही तालुक्यात अतिदक्षतेच्या कोणत्याही उपाययोजना गांभीर्याने केल्या नाहीत. तुम्ही सत्तेत आहात, जनतेची जबाबदारी तुम्हची आहे. आज कोरोनाची परिस्थिती तालुक्यात भयावह असताना सहकारी संस्थाचे विषय काढुन विषयांतर करून राजकारण करत स्वतःची निश्क्रियता, अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न तुम्ही का करत आहात.
               लोकप्रतिनिधी म्हणून पदावर असताना एकही सहकारी संस्था अथवा उद्योग निर्माण केली नाही. तालुक्यातील तरूण बेरोजगारांची संख्येत वाढ झाली आहे. तुम्ही किती बेरोजगार तरूणांना नोकरी दिली याची आकडेवारी जाहीर करा. तुम्ही ज्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते व आजही संचालक आहात, त्या संस्थेची आज काय अवस्था आहे हे सांगायला विसरले की काय? असा सवाल या प्रसिद्धीपत्रकात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
            इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या 1200 च्या वरती गेली असून अपु-या सोयी सुविधांमुळे 50 पेक्षा जास्त रूग्णांचे बळी गेले आहेत. इंदापूर तालुक्यातील कोरोना मृत्यु दर 4 टक्के म्हणजेच जगात सर्वाधिक आहे. या 50 बळी गेलेल्या लोकांची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून कोणाची आहे.कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेता पुरेसे डाॅक्टर नाहीत, गोळ्या औषधांची कमतरता, अपुरी बेडची संख्या, आॅक्सिजन व व्हेंटिलेटरचा आभाव या सर्व बाबींचे वेळेत नियोजन न केल्यामुळे आज ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, हीच का तुमची क्रियाशिलता असा सवाल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
जेष्ठ नेते शंकरराव पाटील यांचा वारसा हर्षवर्धन पाटील यांना असल्यामुळे पराभवाने खचून न जाता आज देखील तालुक्यातील जनतेचे, कोरोनाग्रस्त लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम  करीत आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचेवरील टिका यापुढे आम्ही सहन करणार नाही. सत्तेसाठी राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करा,नाहीतर आम्ही देखील तुमच्या विरोधात रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करू,असा इशाराही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.
________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते