इंदापूर :प्रतिनिधी दि.6/9/20
शेतकरी कुटुंबातील अविनाश शिंदे हा युवक जिद्द व चिकाटीच्या जोरावर देशातील सर्वोच्च परीक्षेमध्ये यश मिळवून जिल्हाधिकारी झाला आहे, याचा इंदापूर तालुक्यातील जनतेला अभिमान आहे.तसेच स्पर्धार्थी युवकांसाठी अविनाश शिंदे यांनी आदर्श घालून दिला आहे,असे गौरवोद्गार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) सन 2019 मध्ये झालेल्या स्पर्धा परीक्षेतून जिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल अविनाश संजीवन शिंदे (पवारवाडी) यांचा हर्षवर्धन पाटील इंदापूर येथे गुरुवारी (दि.3) सत्कार करण्यात आला.
प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अविनाश शिंदे यांनी हे यश संपादन केले आहे.त्यांनी तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करावे,असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.अविनाश शिंदे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. या सत्कार प्रसंगी संजीवन शिंदे, राजेंद्र शिंदे,शांताराम वाकळे, शितल शिंदे, बाळासाहेब मोरे, शिवाजी मोरे, गणेश घोरपडे, सुनील कणसे आदी उपस्थित होते.
********************************
टिप्पण्या