इंदापुर:सध्या कोरोणाची परिस्थिती भयंकर होत चालली आहे, कम्युनिटी स्प्रेड (समुदाय प्रसार) च्या माध्यमातून अनेक जण कोरोणा बाधित होत आहेत.या कोरोणा बाधित रुग्णांना किंवा संशयित रुग्णांना उपचार करते वेळी डॉक्टर्स-आरोग्य कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता कार्य करत आहेत. डॉक्टर्स-आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लागणारे साहित्य कु.अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांच्या जिल्हा परिषदेच्या कोविड कॅश कार्ड अंतर्गत तीन लाख रूपये रकमेचे पी.पी. ई किट, मास्क, ऑक्सिमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर व इतर साहित्याचे वाटप पुणे जिल्हा परिषद सदस्या कु.अंकिता हर्षवर्धनजी पाटील यांच्या हस्ते बावडा येथे बावडा आरोग्य केंद्र व सर्व उपकेंद्रातील सर्व डॉक्टर्स व आरोग्य कर्मचारी यांना केले.
यावेळी बावडाचे सरपंच किरण पाटील, बावडा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अधिकारी डॉ.कपिलकुमार वाघमारे,डॉ.स्नेहल पवार, डॉ.पानबुडे, डॉ.निकिता घोगरे, डॉ.वैशाली खाडे, डॉ.सुमति ढोले व इतर यावेळी उपस्थित होते.
टिप्पण्या