इंदापुर तालुक्यातील व उजनी धरणा शेजारील हिंगणगाव येथे आशावर्करांना सेनिटाझरचे वाटप करण्यात आले,हा कार्यक्रम शासकीय नियमानुसार करण्यात आला,आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपल्यासाठी देवदूत:-जि. प. सदस्य अभिजीत तांबिले म्हणाले कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून
अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.आत्ता तर पुणे सोलापूर रोड वरून ठाणे पोलिस चे अधिकारी गेले व ते कोरोना पॉझिटीव्ह आसल्याची खात्री झाली, त्या मुळे काही पोलीसांना चाचणीसाठी पाठवले आहे त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.
काटी-वडापुरी जि. प.सदस्य अभिजीत तांबिले हे हिंगणगाव येथील उपकेंद्रात आशावर्करांना सेनिटाझर वाटप या कार्यक्रमात बोलत होते,तांबिले म्हणाले की आपणास हिंगणगाव सील बंद करावे लागेल, वेळ प्रसंगी ग्रामदुत म्हणून रस्त्यावर उभारहावे लागेल, किराणा सामान, मंडई, घरपोहोच कशी मिळेल या साठी प्रयत्न केला पाहिजे, या वेळी तरडगाव चे सरपंच पोपट माने, व हिंगणगाव चे कर्तव्य दक्ष व गावक-यासाठी नेहमीच तत्पर आसणारे व गोरगरीब जनतेचा कैवारी, अन्यायाचा कर्दन काळ हिंगणगाव चे धडाकेबाज सरपंच रमेश देवकर म्हणाले की आपल्याच गावातील काही लोकं अपवाद वगळता बाहेरील गावच्या रस्त्यावरून पुणे, मुंबई,येथून सोलापूर कडे जाणा-या लोकांना सिमा बंदी आसल्या मुळे पोलिस यंत्रणा सोडत नाही, म्हणून चीरी मीरी साठी 100,200 रू. च्या लालचेला बळी पडून या कडेवरून त्या कडेला अनेक मोटारसायकल पोहचवत आहेत एकीकडे पोलिस सोडत नाही आणि आपण आपला जिव धोक्यात घालून कोरोना आपल्या घरात आणत आहोत. हि लाजीरवानी बाब आहे आसे मत देवकर यांनी व्यक्त केले. या वेळी व ग्रामसेवक रामेश्वर साठे,इंदापुर ता. वै.अधिकारी डाॅ. पोळ मॅडम, डाॅ.यादव,एच.ओ.शिंदे मॅडम, आरोग्य सेविका, आशावर्कर आणी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंगाडे,कैलास देवकर, विशाल जगताप, सामाजिक कार्यकर्ते नितीन आरडे, ग्रामपंचायत कर्मचारी समाधान देवकर, अमोल आरडे, पांडुरंग गरड ,पत्रकार शिवाजीराव पवार,शिवसृष्टी न्युज चे संपादक धनंजय कळमकर ,इ.उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आभार हिंगणगाव चे कर्तव्य दक्ष ग्रामसेवक रामेश्वर साठे यांनी मानले
टिप्पण्या