इंदापुर: युवा राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्या जन्म जयंती निमित्त अनाथ मुलांना भोजन गोरगरीब लोकांना धान्य व कोरोना या महामारी लढाईसाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व प्रशासनाचे आभार :-प्रदीप पवार श्री सद्गुरू दत्त धार्मिक एवम पारमार्थिक ट्रस्ट इंदोर युवा राष्ट्रसंत उदयसिंह देशमुख उर्फ भय्यूजी महाराज यांच्या जन्म जयंती निमित्त सूर्योदय परिवाराच्या वतीने इंदापूर येथील माऊली बालकाश्रम इंदापूर (आयटीआय च्या पाठीमागे) येथील 50 विद्यार्थ्याँना भारतीय जेवण व उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले
सूर्योदय परिवाराचे श्री सतीश कस्तुरे, प्रदीप पवार मेजर विलासराव गाढवे, धनंजय कळमकर यांनी अन्नदान भोजन दिले व बिस्किटे खाऊवाटप श्री रवींद्र माने व श्री संभाजी गायकवाड सर यांनी केले हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला असून त्यांना आरोग्य संदेश
बहुउद्देशीय समाज सेवा केंद्राचे सहकार्य लाभले यावेळी माऊली बालकाश्रम चे व्यवस्थापक सुशील शेतकर सर उपस्थित होते तसेच निमगाव केतकी (तालुका इंदापूर )येथील गणेश नागरी पत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री किशोर पवार यांनी भय्यूजी महाराज जन्म जयंती निमित्त हातावर पोट असलेल्या गरीब शेकडो
नागरिकांना मोफत धान्य व साहित्य वाटप निमगाव येथे करण्यात आले. यावेळी सूर्योदय परिवाराचे सेवक प्रदीप पवार म्हणालेआज आपल्या भारत माते वर मोठे संकटआहे म्हणजे कोरोना चा नव्याने जन्म झाला आहे चांगल्या वाईट गोष्टी घडतात त्या आपल्या चांगल्यासाठीच घडत असतात नवीन दिशा व आपल्यात बदल होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आज कोरोना या महामारी मुळे काहीतरी चांगला बदल घडावा
माणुसकीचे दर्शन घडावे माणसातला माणूस जागा व्हावा यासाठी आज माननीय भारत मातेचे पंतप्रधान साहेब मुख्यमंत्री साहेब महसूल विभागीय कर्मचारी डॉक्टर नर्स जिल्हा परिषद कर्मचारी आरोग्य विभाग नगरपरिषद महानगरपालिका व आरोग्य विभाग कर्मचारी रक्तदान शिबीर राबवणारे समाज सेवाभावी संस्था निस्वार्थ भारत मातेच्या सेवेसाठी माजी सैनिक "सदरक्षणाय खलनिग्रहणाय "हे ब्रीदवाक्य पालन
करणारे आमचे पोलीस प्रशासन व अन्यायाविरुद्ध न्याय मिळविण्यासाठी निस्वार्थ अहोरात्र मेहनत करणारे आपले सर्व पत्रकार बांधव व रिपोर्टर्स प्रसार माध्यमे यातून या कोरोना च्या महामारी मुळे आज हा बदल व माणुसकीचे दर्शन झाले असाच कायमस्वरूपी ही असे चांगले काम करत राहिले तर आज भारत मातेचे नाव सुजलाम सुफलाम होईल
यासाठी प्रशासनाला सहकार्य करा सूचनांचे पालन करा तसेच सर्व समाज बांधवांची व नागरिकांची जबाबदारी आहे. "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा "याप्रमाणे सर्व सेवा करणारे हे माणसातले खरे देव माणूस आहेत
त्या सेवेतच खरा परमेश्वर आहे या कोरोनाच्या महामारी लढाईसाठी वरील सर्व भारत मातेच्या सेवे करांचे परमपूज्य भय्यूजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदोर शाखा इंदापूर,
टिप्पण्या