मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापुर :तालुक्यातील सरडेवाडी टोलनाका बनला, मृत्यू चा सापळा कोरोना व्हायरस पासून वाचण्यासाठी कोणतीही सुरक्षा नाही ,कोरोनाचा प्रभाव संपूर्ण जगावरती जाणवत असून एका व्यक्तीपासून अनेक व्यक्तींना याची लागण होऊन झपाट्याने रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे सध्या जगामध्ये लाखो लोक या रोगाने संक्रमित झालेले असून हजारो लोक मृत्यू पावत आहेतअनेक प्रगत देश देखील यामुळे हतबल झाले असून या व्हायरसवरती औषध सापडलेले नाही त्यामुळे यावर एकच उपाय नागरीकांनी घराच्या बाहेर न पडणे स्वतःला वेगळे ठेवणे हाच पर्याय सध्या तरी असून
अनेक देशांनी लॉक डाऊन केलेला आहेआपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी .राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आरोग्यमंत्री राजेश टोपे,  यांनी देखील घराच्या बाहेर पडू नका सहकार्य करा असे अवाहन केले आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारविविध उपाययोजना करत आहेत डॉक्टर, आरोग्य कर्मचारी पोलिस यंत्रणा जिवावर उदार होऊन अहोरात्र काम करत आहेत त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.पुणे सोलापूर रोड वरील सरडेवाडी टोलनाका सध्या बनला आहे मृत्यू चा सापळा, कारण येथून नेहमीच वाहणाची रेलचेल, तेथील कामगार सारखेच एका नविन व्यक्ती च्या संपर्कात येतात.हे कामगार. हिंगणगाव, कांदलगाव, शहा, सरडेवाडी, रांझणी, इंदापुर माळवाडी, गलांडवाडी, या गावातील आसल्याने त्या गावातील  स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.यांना कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण दिले जात नाही, कोरोना हा व्हायरस अत्यंत भयानक प्रकारचा आहे बारामती तालुका म्हणजे हाकेच्या अंतरावर येऊन ठेपला आहे. इंदापुर तालुक्यातील  आ.दत्तात्रय भरणे, मा.ना.हर्षवर्धन पाटील कर्तव्य दक्ष  नगराध्यक्षा अंकिता शहा, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयराव परीट, सभापती पुष्पा रेडके, पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर हे कोरोना ला हद्दपार करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत आणि दुसरीकडे हा माजुरा टोलनाका व्यवस्थापक कोरोना विषयी बिनधास्त आहे म्हणजे काय हि लाजीरवानी बाब आहे? 
  टोलनाका वरिष्ठ  कर्मचारी, या कडे गांभिर्याने विचार करत नाहीत. काही दिवसांपूर्वी ठाणे येथीलपोलिस सोलापूर ला याच टोलनाक्या वरून गेलं होतं त्यांना सोलापूर ला गेल्यावर त्रास सुरू झाला, ते कोरोना  पॉझिटीव्ह आसल्याची खात्री झाली, त्या नंतर काही अपवाद वगळता पोलिस कर्मचारी तपासले तर ते निगेटिव्ह आले, पण टोलनाका कर्मचारी कोण तपासणार...यांना वाली कोण?
टोल प्लाजा कंपनी सरडेवाडी
पुणे- सोलापुर नॅशनल हायवे यांना वरिल गावाच्या वतीने सरपंच, ग्रामसेवक यांनी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. त्यात आसे नमुद केले आहे, 
 कोरोना विषाणु संसर्ग प्रतिबंधात्मक उपाय योजना करावी , आपणास कळविण्यात येते की, सरडेवाडी ग्रामपंचायत
कार्यक्षेत्रात आपल्या कंपनीचा टोल नाका आहे. सदर टोल नाक्यावर कामगार म्हणून बहुतांश कामगार हिंगणगाव येथील आहेत व सदर टोलनाक्यावर वर्दळीचे व जनसंपर्काचे कामकाज
असल्याने सदर कामगारा मार्फत गावात कोरोना विषाणूंचा प्रादु्भाव होण्याची शक्यता नाकारता
येत नाही. त्या करिता कामावरील कामगारांना सुरक्षिततेच्या दृष्टीने उपायोजना करावे व
कामगारांचे आपल्या कार्यक्षेत्रात विलगीकरण कक्षात ठेवण्याची आपल्या मार्फत व्यवस्था करावी.
सदर बाबीची पूर्तता न झाल्यास व सोबतच्या यादीतील कामगारास  त्यांच्या धरून
कुटुंबास तसेच गावात कोरोना साथीचा प्रादुर्भाव झाल्यास 
आपल्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल 
आशा आशयाचे पत्र टोलनाका व्यवस्थापन समिती कडे देण्यात आले, या वेळी, कर्मचारी व बाभूळगावचे सरपंच भारत यादव, ग्रामसेविका.इतर उपस्थित होते. 
टोलनाका व्यवस्थापक यांना आमच्या लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज चे संपादक मंडळी भेटले आसता ते म्हणाले की आम्ही सॅनिटायझर व हातमोजे काही दिवसापूर्वी कर्मचारी यांना दिले आहे, परंतु 50रू. किमतीचे सॅनिटायझर आम्हाला परवडत नाही म्हणून आम्ही डेटाॅल पाण्यात मिसळून हाताला लावण्या साठी देतो, सॅनिटायझर पाच दिवस झालेत संपले आहे, येईल त्या वेळी कर्मचारी लोकांना वाटप करण्यात येईल, आसे ते म्हणाले, 

एका कर्मचा-याला विचारले आसता ते म्हणाले की आम्हाला समाजसेवक महेंद्र रेडके यांनी सॅनिटायझर व मास्कचे वाटप काही दिवसांपूर्वी केले होते,त्यावरच आम्ही खुश होतो, आम्हाला टोलनाका कंपणीने सुरक्षा म्हणून अपवाद वगळता काही दिले नसल्याने सांगितले, एखाद्या दिवशी कामावर हजर राहिलो नाही तर नोटीस काढली जाते, आम्हाला कोरोना झाला तर परिवाराचे काय होणार,....?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते