वर आपल्या वडिलांच्या प्राणांची भीक मागताना रडताना भोडणी येथील आण्णा गोसावी
इंदापुर (लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज वृत्त सेवा इंदापुर )कोरोना व्हायरस प्रतिबंधासाठी घोषित संचार -बंदीत इंदापूर अकलूज राज्य मार्गावरील अकलूज हद्दीतील पोलीस तपासणी नाक्या वरील पोलीस व प्रादेशिक परिवहनविभागाचे अधिकारी जनता, डॉक्टर, रुग्ण,पत्रकारांना सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याचा दम देत असल्याने हानाका मृत्यूचा सापळा बनला आहे. या तपासणी नाक्यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांचा वाहन पास दाखवलातर त्याची दखल घेतली जात नाही, याउलट त्यांना आपल्या नातेवाईकांचा जीव वाचविण्या साठी त्यांच्यासमोर केविलवाणा चेहरा करून तासनतास प्राणांची भीक मागावीलागते,रडावे लागते तरी सुद्धा त्यांच्या हृदयास पाझरफुटत नाही. त्यामुळे या आठवड्यात तीन जणांना मृत्यू आला आहे.
इंदापूर व अकलूजचे व्यापार,आरोग्य,शेती, सहकारी साखर कारखाने यामुळेपहिल्यापासून नाते आहे. इंदापूरपेक्षा अकलूजमध्ये वैद्यकीय सुविधा जास्त उपलब्ध असल्याने इंदापूरकर अकलूजला अनेक वर्षांपासून प्राधान्य देत आहेत. मात्र कोरोना संचारबंदीमुळे पोलीस इंदापूरच्या लोकांना अकलूजमध्ये प्रवेश देत नसल्याने व अकलूजच्याडॉक्टरांनी लिहिलेली औषधे इंदापूरला मिळत नसल्याने रुग्णांची केविलवाणी अवस्था झाली आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे औषध मिळत नसल्याने जेष्ठ नागरिक चिंताग्रस्तझालेआहेत. याउलट राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या स्वीय सहायकाचा फोन आला कीत्यांनीसांगितलेल्या गाड्या कुठलीही तपासणी न करता लगेच सोडल्या जात आहेत तर इतर माल वाहतूक करणाऱ्या वाहकाशी अर्थपूर्ण घडामोडी होत असून गाडीतील फळे, तरकारी काढल्या शिवाय गाड्या सोडल्या जात नाहीत. पोलिसांच्या आरेरावीमुळे सर्वजण त्रस्त झाले असून त्यामुळे ते पोलीसांच्यापंटरकडेमांडवली करून आपली सुटका करून घेत आहे. इंदापूर तालुक्याच्या विविध प्रश्नांवर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच पोलीस प्रमुख यांच्याकडे चार दिवसांपूर्वीच चर्चा केली मात्र सोलापूर अधिकाऱ्यांनी त्यास वाटाण्याच्या अक्षदा दाखविल्या. एकीकडे कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासन काम करत असताना ऑपरेशन झालेले रुग्ण, जेष्ठ नागरिक रुग्णांना मात्र अकलूज तपासणी नाक्यावरील अधिकारी वाऱ्यावर सोडत असून त्यामुळे इंदापुरात उद्रेक वाढत आहे.
टिप्पण्या