घरोघरी वृत्तपत्र वितरणावरील निर्बंध उठविण्यास परिषदेस यश- हाजी एम डी शेख.
.इंदापूर:अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मागणीची दखल घेवून वृत्तपत्र वितरणावर शासनाने घातलेले निर्बंध मुख्य सचिवांकडून मागे घेण्यात आल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष हाजी एम. डी. शेख यांनी शिवसृष्टी न्युज व लक्ष्मी वैभव न्युज यांच्या प्रतिनिधींना दिली. श्री शेख पुढे म्हणाले, वृत्तपत्रे ही भारतीय लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून घरोघरी वृत्तपत्र वितरणावर घातलेले निर्बंध राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दि. 21 एप्रिल रोजी आदेशाव्दारे माघारी घेतला आहे . वृत्तपत्र वितरणावर घातलेले निर्बंध माघारी घेण्याबाबत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने थेटमुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना ई-मेल करून निवेदनाद्वारे निर्बंध उठविण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीस अखेर यश प्राप्त झाल्याने वृत्त पत्र व्यवसाय तसेच वाचकांनादिलासामिळाला आहे. वृत्तपत्र वितरणातून कोरोनाचा फैलाव होत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) स्पष्ट केले असताना अचानक घरोघरी वितरणावर बंदी घालण्याचा अजब निर्णय राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी परिपत्रक काढून घेतला होता. त्यामुळे जनतेतून उद्धवा, अजब तुझे सरकार असे म्हटले जात होते तर सदर निर्णयामुळे सर्व वृत्तपत्रे अडचणीत आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सदरचे परिपत्रक मागे घेण्याचे आदेश मुख्य सचिवांना द्यावेत अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हाजी एम.डी. शेख व सचिव अरुणकुमार मुंदडा यांनी रविवार दि. १९ एप्रिल रोजी ई-मेल निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत आजराज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी वृत्तपत्रांवर घरोघरी वितरित करण्याचा आपला आदेश माघारी घेतला. त्यामुळे परिषदेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान वृत्तपत्रांविषयी सकारात्मक निर्णय घेऊन परिषदेची मागणी तात्काळ मान्यकेल्या बद्दल परिषदेचे अध्यक्ष हाजी एम.डी. शेख यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल करून त्यांना धन्यवाद दिले.घरोघरी वृत्तपत्र वितरणावरील निर्बंध उठविण्यास परिषदेस यश- हाजी एम डी शेख.
टिप्पण्या