स्वातंत्र्यसेनानी नारायणदास रामदास शहा यांना अभिवादन
इंदापूर येथील स्वातंत्र्यसेनानी वै.ह.भ.प. नारायणदास (बप्पा ) रामदास शहा यांच्या 31 व्या पुण्यतिथी निमित्त इंदापुरातील अनेक नागरिक, विविध संस्थेने लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सोशल माध्यमातून अभिवादन केले.
महात्मा गांधी यांच्या आचार-विचार यांना प्रेरित होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणदास शहा यांनी आपल्या जीवनाचा मार्ग अवलंबला होता.समाजसेवेचे व्रत कायम अंगीकृत करत बप्पा यांनी स्वातंत्र्यवीरांना मदत ते शैक्षणिक संस्थेची उभारणी यासारख्या सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले.
श्री. नारायणदास रामदास सेवक सहकारी पतसंस्था मर्या.इंदापूर यांच्या माध्यमातुन दरवर्षी प्रशालेमध्ये पूण्यस्मरण केले जाते. विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले जात असते. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सोशल माध्यमातून अनेक नागरिकांनी फेसबुक, व्हाट्सअप च्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले. त्यांच्या कार्याचे स्मरण केले.
गोकुळदास (भाई) शहा, मुकुंद शहा,भरत शहा, नगराध्यक्षा अंकिता शहा, वैशाली शहा यांनी स्वातंत्र्यसेनानी नारायणदास रामदास शहा यांच्या प्रतिमेचे घरी पूजन केले.
टिप्पण्या