इंदापूर:(शिवसृष्टी न्युज, लक्ष्मी वैभव न्युज वृत्तसेवा इंदापुर)द्राक्षे बागायत दारांचे कोट्यावधी
रुपयांचे नुकसान झाले आहे. पुणे व सोलापूर
जिल्ह्यातील लाखो हेक्टर द्राक्ष पिके मातीमोल झाल्याने
द्राक्ष बागायतदार हवालदिल झाले आहेत.
तोडायला आलेली द्राक्ष बागेतच सडुन जात आहेत किंवा
वाहतूक खर्चात विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांवर
कर्जाचा बोजा वाढणार आहे. यामुळे शासनाने द्राक्ष
बागायतदारांना मदत करावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव
ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
करून विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे
मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी सांगितले.
यावेळी बोलताना माने म्हणाले की द्राक्षांपासून व
मनुके, पल्प मोठ्या प्रमाणात बनवले जातात. मात्र इंदापूर आणि मोहोळ
तालुक्यात मोठ्याप्रमाणावर शेतक-्यांचे नुकसान झाले
आहे. इंदापूर तालुक्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणात
द्राक्ष बागा आहेत. यावर्षी तालुक्यात दोन हजार पाचशे
हेक्टर द्राक्ष लागवड करण्यात आली आहे. केळी एक
हजार हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. द्राक्ष
बागायतदारांना एकरी पन्नास हजार रुपये खर्च येतो तर
केळी बागायतदारांना चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये
खर्च येतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेला खर्च वाया
गेला आहे या बरोबरच एक वर्ष केलेले कष्ट आणि विज
बिल भरावे लागणार असल्याने शेतक-्यांचे पुरते कंबरडे
मोडले आहे. तालुक्यातील दुष्काळी भागात शेतक-यांनी
शेततळ्यांच्या पाण्यावर द्राक्ष पिक घेतले आहे. यामुळे
कर्जाचा बोजा वाढणार आहे. या अवस्थेत शेतकरी
असल्याने शासनाला मदत करण्याची मागणी करणार
असल्याचे मोहोळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार यशवंत (तात्या) माने यांनी सांगितले.
द्राक्ष बागायतदारांना अवकाळी पाऊस, हवामानातील
बदल, बाजार भावाचा चढ उतार सहन करावा लागत
असतानाच आता कोरोनाच्या संकटाने द्राक्ष
बागायतदारांचे आतोनात हाल झाले आहेत, महाराष्ट्र राज्यातील द्राक्ष
उत्पादनात इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा
सहभाग आहे. राज्यातील नाशिक पाठोपाठ इंदापूरचे व
मोहोळ तालुक्यातील शेतकरी अधिकची द्राक्ष उत्पादित
करत आहेत. मात्र वेळोवेळी येणा-या संकटाने द्राक्ष
बागायतदार पुरता कोलमडला आहे.आसे मत आ.यशवंत माने यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केले.
********************************************
टिप्पण्या