इंदापूर(लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज वृत्त सेवा इंदापुर) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सर्वच सामजिक क्षेत्रातील प्रतिष्ठान, तसेच संस्था आपापल्या प्रमाणे सामजिक कार्य करत आहेत त्याच पार्श्वभूमीवर इंदापूर पोलीस स्टेशनला लोकसेवक गणपतराव आवटे फौंडेशन व श्री.शिवशंभो चाँरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने पोलीस कर्मचारी व नगरपालिकेचे कर्मचारी दिवस रात्र एक करत आपली ड्युटी बजावत असताना 251 कापडी मास्क व रबरी हॅन्डग्लोज चे वाटप करण्यात आले. हे मास्क इंदापूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी त्यांनी लोकसेवक गणपतराव आवटे फाऊंडेशन चे आभार मानले.
सामजिक बांधिलकी जपत हे कापडी मास्क व रबरी हॅन्डग्लोज इंदापूर नगरपालिकेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना मिळावे यासाठी इंदापूर तालुक्यातील प्रत्येक नाकाबंदी वरती तैनात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा हातात हे पोच करण्यात आले. त्यांनीही आभार मानले.
सहा. पोलीस निरीक्षक बी. एन. लातुरे, ठाणे अंमलदार अरुण रासकर, शंकर वाघमारे, आरने, पोलीस कॉन्स्टेबल विनोद काळे, विनोद पवार, तसेच ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष भूषण सुर्वे, लोकसेवक गणपतराव आवटे फौंडेशन चे अध्यक्ष सागर आवटे,मार्गदर्शक प्रा.कृष्णाजी ताटे सर,इंदापूर तालुका अध्यक्ष मनोज आण्णा राक्षे, भिगवण शहर अध्यक्ष सुरज पुजारी, संपर्क प्रमुख विशाल धुमाळ, ट्रस्ट चे सचिव संतोष मोरे, विजय डोंगरे, हे या वेळी उपस्थिती होते.
टिप्पण्या