कोरोना ला हद्दपार करण्यासाठी शिवधर्म फाऊंडेशनचे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रात आरोग्यदूत म्हणून काम करतील -दिपक आण्णा काटे,..सामान्य जनतेचा आधार
इंदापूर: शिवधर्म फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक, अध्यक्ष पै. दिपकआण्णा काटे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासणार शिवधर्म फाउंडेशन अशी पत्रकारांना माहिती दिली.
सध्या भारतामध्ये जो कोरोना व्हायरसचं खूप मोठ संकट घोंगावत आहे. या संकटात अनेक डॉक्टर , नर्स, पोलिस अधिकारी , सामाजिक संघटना, खुप मोलाचं काम करतात या सर्वांना शिवधर्म फाउंडेशनच्या वतीनं शेलूट करत आहे .
शिवधर्म फाऊंडेशन माध्यमातून जवळजवळ महाराष्ट्रात हजारो कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. वेळप्रसंगी महत्त्वाचे कार्यकर्ते जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मूठभर मावळे घेऊन स्वराज्याची स्थापना केली.
त्याप्रमाणे आमच्या शिवधर्म फाऊंडेशनचे महत्त्वाचे कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते महाराष्ट्रात वेळप्रसंगी कोरोना व्हायरस या आजाराला तोंड देण्यासाठी किंवा डॉक्टर , नर्स , पोलीस, पत्रकार यांना मदत करण्यासाठी शेकडो कार्यकर्ते महाराष्ट्रात आरोग्यदूत म्हणून काम करतील असे त्यांनी जाहीर केलं.
पुर्ण विश्वामध्ये कोरोना व्हायरस हा आजार थैमान घालत असताना अतिशय प्रगतशील देशांनी कोरोना व्हायरसपुढे हात टेकले असतानां भारतात देश हा दऱ्याखोऱ्याचा , अनेक जाती धर्माचा , अनेक रुढी, पंरपंरा , चालढाल, अनेक भाषा आशा प्रकारचा देश असताना आदरणीय भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जो निर्णय घेतले त्यामध्ये लॉकडाऊन , संचारबंदी , जनता कर्फ्यू , हे सर्व अतिशय खूप चांगले निर्णय घेतले असून आतापर्यंत भारतासाठी जे आदरणीय नरेंद्र मोदींनी जे निर्णय घेतले आहेत असे त्यांच्यासारख्या एक ही निर्णय कुणी घेऊ शकणार नाही आणि घेणार नाही. जगामधील सर्व देशातील आणि भारतामधील आत्ता पर्यंत होऊन गेलेल्या सर्व पंतप्रधाना मध्ये एकमेव असे आदरणीय नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत.
खरंच असा पंतप्रधान परत भारताला लाभणार नाही असे त्यांनी पत्रकारांना आपली प्रतिक्रिया दिली.
येणाऱ्या काळामध्ये शिवधर्म फाउंडेशन च्या माध्यमातून इंदापूर तालुका व महाराष्ट्रात आणि भारत देशात कुठे ही गरज भासल्यास शिवधर्म फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते आरोग्यदूत म्हणून काम करणार आहेत जिथे लागेल तेथे मदत करणार आहेत असे त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
इंदापूर तालुका आणि महाराष्ट्र व भारत देशातील जनतेला आव्हान आहे की , आपण स्वतः स्वतःची काळजी घ्या. आपल्या परिवाराची काळजी घ्या. आपल्या नातेवाईक काळजी घ्या. पोलीस, डॉक्टर , नर्सताई, अंगणवाडी सेविका , अंगणवाडी मदतनीस , पत्रकार ही सर्व मंडळी अहोरात्र लोकांना कुठलाही त्रास होऊ नये . लोकांच्या जीवला धोका निर्माण होऊ नये, लोकांना कोरोना व्हायरस हा आजार होऊ नये म्हणून रात्रंदिवस झटत आहेत.
त्या सर्वांना साथ देणे आपलं कर्तव्य आहे आणि आपली काळजी स्वतःची घेतली पाहिजेल असे त्यांनी विचार व्यक्त केले. जिथे जिथे मदत लागेल तेथे सरकारी यंत्रणेनी सुद्धा आमच्या शिवधर्म फाऊंडेशनच्या प्रत्येक गावातील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते किंवा आम्हाला सुद्धा तात्काळ कळवावे. जिथे मदत लागले तिथे आमचा कार्यकर्ता आरोग्यदूत म्हणून काम करण्यास तयार आसेलं असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.
येणाऱ्या काळामध्ये अनेक सामाजिक प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी , शिवधर्म फाउंडेशन मोठ्याप्रमाणावर लढा उभारणार आहे आणि शेतकरी व सामाजिक घटकांना न्याय द्यायचं ही काम करणार आहे.
शिवधर्म फाउंडेशन प्रत्येक गावात, तालुका , जिल्हा आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाखा ओपन केली असून हजारो युवकांचे एकजुटीने संपर्क ठेवून हे संघटना काम करत आहे. शिवधर्म फाउंडेशन जे काम करत आहे त्या कामाबद्दल अनेक सामाजिक संघटना व नागरिकांकडून कौतुक होत आहे. शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य माध्यमातून इंदापूर तहसील कचेरी येथे सुविधा सेतु मध्ये होणारा भ्रष्टाचार या संदर्भात खूप मोठा आंदोलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे रक्तदान शिबिर घेतले होते इंदापूर तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमीत कमी २, ४०० बाटल्या रक्त जमा करण्याचे काम शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
अशा अनेक सामाजिक कामाला शिवधर्म प्राधान्य देणारा आहे असं आपलं मत त्यांनी व्यक्त केलं आहे .पुन्हा एकदा सर्व इंदापूर तालुक्यातील व महाराष्ट्र आणि भारत देशातील जनतेला नम्रपणे आव्हान आहे. आपण सर्वांनी शासनाने संचारबंदी व जे नेम घालून दिले आहेत त्याचे उल्लंघन करू नका . पोलिस , डॉक्टर , पत्रकार , नर्स, या सर्वांना सहकार्य करा.
किराणामाल खरेदी करत असतानां किरणा माला घेतानां, किराणा दुकानदारांनी आणि ग्राहकांनी सुद्धा स्वतःची काळजी घेतली पाहिजेल. ज्या गोडाऊन मधून किराणामाल पोच केला जातो तिथून काळजी घेऊन दुकानदारा पर्यंत पोहोचेपर्यंत काळजी घेतली पाहिजेल. तिथून पुढे दुकानदारांनी सुद्धा स्वतःची काळजी घेतली पाहिजेल आणि ग्राहकांनी माल घेतानां काळजी घेतली पाहिजेल असे त्यांनी आपल्या विचार व्यक्त केले . भाजीपाला खरेदी करत असताना आत्यावश्यक वस्तू खरेदी करत असताना दोन माणसांमध्ये अंतर ठेवून खरेदी केला पाहिजेल. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि जे आपल्यासाठी आहोरात्र , रात्रंदिवस झटत आहेत त्यांचे अभिनंदन करून त्यांना सहकार्य करा असे दिपकआण्णा काटे शिवधर्म फाऊंडेशन संस्थापक, अध्यक्ष यांनी केले.
*********************************************
लक्ष्मी वैभव न्युज संपादक विलासराव गाढवे 9423212127
शिवसृष्टी न्युज संपादक धनंजय कळमकर
9860976747
टिप्पण्या