इंदापूर तालुक्यातील कुक्कुटपालन व्यवसाय करणारा शेतकरी कोरोनामुळे मोठ्या आर्थिक संकटात शासनाकडे मदतीची हाक ;
इंदापूर :तालुक्यातील सराफवाडी, पिटकेश्वर, घोरपडवाडी , निरवांगी , निमगांव केतकी अशा अनेक गावांमध्ये अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कक्कुटपालन व्यवसाय करतात. काही शेतकऱ्याकडे कंपनीने दिल्याले पक्षी म्हणजे कोंबड्या काही शेतकऱ्यांनी असून काही शेतकऱ्यांचा स्वतःचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतात .कोरोना आजारामुळे अफवा पसरली की कोंबडी पासून कोरोना आजार होतो यामुळे कोणी चिकन , कोंबडी खरेदी करायला तयार नाही याचा फटका कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याला खूप मोठा बसला आहे . शेतकऱ्याचं कंबरडेच मोडलं आहे . देशात संचारबंदी असल्याने आणि वाहतूक बंद आसल्याने व्यापारी यांनी कोंबडी खरेदीकडे पाठ फिरवल्याने आणि अफवेमुळे अतिशय भयंकर इंदापूर तालुक्यातील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थिती आहे .आमचे प्रतिनिधी कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्मवर भेट देऊन माहिती घेतली असता ४० दिवसात कोंबडीचा लाँट घेऊन जाणारी कंपनी आणि व्यापारी ८५ दिवस झाले तरी शेतकऱ्यांचा माल नेहण्यास नकार दिला आहे. कोंबडीचे वजन दोन ते अडीच किलोच्या आसपास झाले कि खरेदी-विक्रीसाठी कंपनी व व्यापारी घेऊन जातात . सध्या जवळजवळ कोंबडीचे वजन तीन किलो ते साडेचार किलो झालं आहे . अनेक कोबंड्या (पक्षी ) मरू लागले आहेत . कंपनीने हात वर केल्याने शेतकऱ्याला स्वतःचं खाद्य द्यावे लागत आहे. काही शेतकऱ्याला खाद्य व कुक्कुटपालन साठी जे तुस खत लागतं हे सुद्धा परवडतं नाही .
********************************************
टिप्पण्या