मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज


इंदापुर:पत्रकार संरक्षण कायदा कडक आसताना काही चिरीमिरी साठी दलाली, भडवेगीरी करणारे राजकिय लोकांच्या ताटाखालची मांजर,आशी ना-लायक लोकं पत्रकारांना- आरेरावी, दमदाटी, करण्याची भाषा करतात लाजा वाटत नाही यांना, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावात खुलेआम दारू विक्री होते ही लाजीरवाणी बाब आहे, एकीकडे अजित पवार जनतेच्या हितासाठी रात्रंदिवस झटत आहेत,आणि दुसरीकडे त्यांच्या गावातील बेकायदेशीर धंद्याच्या विरोधात बातमी टाकली म्हणून काही सडक्या मेंदुची माणसं पत्रकारांना फेसबुक वरून आरेरावी करत असतील तर,पत्रकार जशाच तसे उत्तर देतील, पत्रकारांना लेचेपेचे समजण्याची भूल कोणत्याही पक्षातील नेत्यांनी किंवा कार्यकर्ते यांनी करू नये...!  एकिकडे कोरोना या महाभयंकर व्हायरस मुळे अखंड भारत देश हादरला आहे. पत्रकार आपल्या परिवाराची , व स्वताच्या जिवाची पर्वा न करता बातमी दारी करतात,आणि सर्व सत्य जनतेच्या समोर आणतात आणि वरून आशा धमक्या......जरा जनाची नाही मनाची तरी लाज बाळगावी आशा महाभागांनी 
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य तथा दै प्रभातचे पत्रकार गोकुळ मगणलाल टांकसाळे रा. काटेवाडी(ता.बारामती) यांनी बारामती विभागात 'पोलिसांना मारहाण झाल्याची व  काटेवाडी गावात अवैध दारू धंदे चालू' असल्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध केल्याने धनंजय काटे रा. काटेवाडी ता. बारामती यांनी पत्रकार गोकुळ टांकसाळे यांना मो. नं. 9595950795 या फोनवरून संदेश पाठवुन दमदाटी केली आहे.त्यांच्या विरुद्ध बारामती पोलीस ठाण्यात एन. सी. आर दाखल केला आहे,तरी पत्रकारांना दमदाटी करणाऱ्या व गावात अवैध धंद्याना खतपाणी घालणाऱ्या आरोपी धनंजय काटे याच्या पासून पत्रकारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे त्याच्यावर पत्रकार सरंक्षण कायदा अंतर्गत अणखी एक गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्यात यावी व ठोस आरोपीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्या वतीने करण्यात आली आहे.
           यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका यांच्यावतीने राज्याचे गृहमंत्री, तसेच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक व बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह संबधितांना निवेदन पाठविले आहे,या निवेदनावर इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते, तालुका कार्याध्यक्ष जावेद मुलाणी,तसेच मुख्य सचिव सागर शिंदे यांच्या सहया आहेत 
           एकीकडे २४ मार्चपासून कोरोना व्हायरस मुळे राज्यात तसेच संपूर्ण देशात पूर्णतः लॉक डाउन करण्यात आला असून, राज्यातील सर्व दारूची  बंद ठेवण्यात आली आहे. मात्र  शहरी तसेच ग्रामीण भागात सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेवून अनेक ठिकाणी बेकायदा  दारु, गावठी दारु विक्रीचे प्रकार समोर आले आल्याने आता अशी विक्री करणा-यावर दारुबंदी कायद्यांसह एम.पी.डी.ए.सारख्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र राज्यातील शहरी आणि ग्रामिण भागातीत बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याचे चित्र आहे. याची गंभीर दखल राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतली असून, अशी विक्री करणा-यांवर दारुबंदी कायद्यांसह एम.पी.डी.ए.सारख्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उपायुक्त तसेच संबंधित अधीक्षकांना नाकाबंदी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच राज्यात अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध जोरदार कारवाई करण्याचे तसेच गुन्हे नोंदविण्याचे निर्देश दिलेले आहेत.त्यानुसार गोवा, दादरा – नगर हवेली, दीव – दमण, कर्नाटक व मध्यप्रदेश राज्यातून अवैध मद्य येणार नाही याकरिता १२ कायमस्वरूपी आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवरराज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी-कर्मचारी तपासणी करीत आहेत, तसेच १८ तात्पुरते सीमा तपासणी नाके उभारण्यात आले असून पूर्ण नाकाबंदी करण्यात आलेली आहे. विभागातील अधिकारीकर्मचारी अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध गुन्हा अन्वेषणाची धडक कारवाई करीत आहेत. गेल्या दोन दिवसात राज्यात ९४ वारस, १२१ बेवारस असे एकूण २१५ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९४ आरोपीना अटक करण्यात आले आहे व एकूण रु. ४६ लाख ६९ हजार ६९९ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वारंवार गुन्हे करणारे व अशा कृत्याच्या पाठीमागे असलेल्या सर्व संबंधीत लोकांवर जरब बसविण्यासाठी अशा लोकांच्या मुसक्या आवळुन दारुबंदी कायद्यांसह एम.पी.डी.ए. सारख्या कायद्याखाली कठोर कारवाई करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
         आसा आदेश आसताना जर काटेवाडी येथे खुलेआम दारू विक्री होते ही लाजीरवानी व निंदनीय बाब आहे. तसे पहिले आसता अपवाद वगळता इंदापुर बारामती रोड, पुणे सोलापूर रोड वरील अनेक ढाब्यावर पाहिजे ती दारू विक्री आजही सुरू आहे.पत्रकारांनी बातम्या दिल्या म्हणून त्यांना दमदाटी, करणे कोणत्या कायद्यात बसतं. 

*******************************************

लक्ष्मी वैभव न्युज संपादक विलासराव गाढवे 9423212127
शिवसृष्टी न्युज संपादक धनंजय कळमकर 
9860976747

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते