कोरोना विषाणूमुळे सॅनिटायझर चे #पोलीस #ग्रामप्रशासनास_वाटप
लाखेवाडी:जगभरामध्ये #कोरोना ( कोविड १९) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. आपला भारत देश पण या परिस्थितीतून जात आहे,भारतमध्ये सर्वाधिक या विषाणूग्रस्त आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे आरोग्य व प्रशासन व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. यावेळी #महाराष्ट्र शासनाने राज्यामध्ये #संचारबंदी लागू केली आहे,विषाणूग्रस्त रुग्णाचे प्रमाण वाढत असताना #सॅनिटायझर व मास्क यांचा #तुटवडा भासत आहे.
सामाजिक जबाबदारीचा विचार करता, जय भवानीगड विकास प्रतिष्ठान(JBVP) संचलित, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री अमोल बन सर व प्राध्यापिका रचना दास यांनी #फार्मसी_महाविद्यालयाच्या_प्रयोगशाळेत_सॅनिटायझरची_निर्मिती केली आहे. आज या स्थितीमध्ये बाजारामध्ये सॅनिटायझर ची मागणी वाढली आहे त्यामुळे कामरता निर्माण झाली आहे, यावेळी हे सॅनिटायझर महाविद्यालयाने #बावडा_पोलीस स्टेशन मधील आधिकाऱयांना उपयोगात यावे म्हणून पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री अजितकुमार जाधव साहेब यांना सुपूर्त केले, त्याचबरोबर लाखेवाडी गावचे सरपंच मा.श्री.सोमनाथ गायकवाड यांना सुद्धा ग्रामपंचायतीतील कर्मचारी वर्गास उपयुक्तेसाठी सुपूर्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.श्रीमंत ढोले सर,उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले मॅडम,मुख्य सल्लागार श्री.प्रदीप गुरव साहेब , सचिव हर्षवर्धन खाडे , फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सम्राट खेडकर , मुख्य जनसंपर्क अधिकारी गणेश पवार व इतर उपस्थित होते.
महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाने #सामाजिक_बांधिलकी जपत आपल्या विध्यार्थ्यांना व समाजाला एक #संदेश दिला आहे. या त्यांच्या स्तुप्त उपक्रमाबद्दल सर्वच स्तरातून #स्वागत होत आहे.
******************************************
टिप्पण्या