* महाराष्ट्र राज्य जनसेवा पत्रकार संघाकडून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन; कठोर कारवाईची केली मागणी. * इंदापूर :- दै. समर्थ भारतच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मंचर येथील एका बिल्डरने आणि त्याच्या नातेवाईकांनी अश्लील शिवीगाळ व धक्काबुक्की करत मारहाण केली. असून याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास या गुंडांनी पत्रकार स्नेहा बारवे आणि समीर राजे यांना ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून; आंबेगाव तालुक्यात बीडच्या मस्साजोगची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मंचर शहरातील एस कॉर्नर परिसरात असणाऱ्या नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीच्या डेव्हलपरने त्याच्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी केल्याचा संशय, मीटरमधे हेराफेरी, बायपास, वीज चोरी आदी गोष्टी करत असल्याचे चित्रीकरण केल्याचा संशय, तसेच नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीमधील फ्लॅटची विक्री करून सदर ठिकाणी सोसायटीची नोंदणी न करता सदनिका धारकांची फसवणूक होत असून, ही फसवणूक संबंधित पत्रकार उघड करतात की काय? असा संशय मनात ठेवून संतापून...
SHIVSRUSTHI NEWS