मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमधील भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी विविध जिल्ह्यातून 157 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग*.

  इंदापूर:- * जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी संस्थेच्या उपाध्यक्षा माननीय सौ.चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये पुणे,सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. * जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,  प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल, विद्यानिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेच्या उपाध्यक्षा मा.सौ.चित्रलेखा ढोले मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त JBVP चषक, भव्य आंतरशालेय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केलेले होते  *ही स्पर्धा दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित केली होती *स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून या स्पर्धेद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांचे उज्वल भविष्य घडावे, आदर्श पिढी निर्माण व्हावी, उत्तम वक्ता हा शालेय जीवनापासूनच घडत असतो म्हणूनच या स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेची विभागणी तीन गटांमध्ये करण्यात आलेली ह...

*माळवाडीकरांनी नेत्र तपासणी शिबिरास दिला उत्स्फूर्त प्रतिसाद*

 इंदापूर:- सोनाई परिवाराचे संचालक तथा माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रवीण माने यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर इंदापूर तालुक्यातील माळवाडी नं. १ या गावी संपन्न झाले. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादातून संपन्न झालेल्या या शिबिरामध्ये तब्बल ९२८ नागरिकांनी आपली नेत्र तपासणी करून घेतली.  माळवाडी नं. १ येथील गणेश मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे सकाळी १० वाजता प्रविण माने यांच्या हस्ते उदघाटन होऊन नेत्र तपासणी शिबिरास सुरवात झाली.  दिवसभर पार पडलेल्या या नेत्र चिकित्सा शिबिरात एकूण ९२८ नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली असून यातील ५०९ नागरिकांना चष्मा वाटप करण्यात आले असून यातील १३ जणांची पुणे येथील भारती विद्यापीठ हॉस्पिटल येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडणार आहे. साधू नरुटे, प्रविण निगडे, दत्ता रासकर, सुनिल पिंपरे, माधव फलफले, यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर निलेश रंधवे, छगन बनसुडे, अंकुश दोरकर, डॉ. शरद शिके, तमन्ना मॅडम, डॉ. संतोष रणवरे यांनी या शिबि...

*संपूर्ण तालुक्यातून मोतीबिंदूला हद्दपार करण्याचा निर्धार निरवांगी येथील मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिरातून दशरथ माने यांचे प्रतिपादन*

 इंदापूरनिरवांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्रवीण माने यांच्या माध्यमातू न रबवण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिरास आज सकाळी १० वाजल्यापासून सुरवात झाली. निरवांगी व परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत मोफत नेत्र तपासणी करून घेतली आहे. सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांच्या हस्ते निरवांगी येथील या शिबिराचे उदघाटन पार पडले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना दशरथ माने यांनी आपले सुपुत्र प्रविण माने यांनी संपूर्ण इंदापूर तालुक्यातून मोतीबिंदू आजाराला हद्दपार करण्याचा निर्धार केला असून यासाठी अधिकाधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान केले. संग्राम माने, अक्षय माने व निलेश माने यांनी निरवांगी येथील या मोफत नेता तपासणी शिबिराचे आयोजन केले होते तर निलेश रंधवे, छगन बनसुडे, अंकुश दोरकर यांनी या कार्यक्रमाचे सर्व नियोजन सांभाळले. निरवांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सकाळी १० ते ५ या वेळेत १२०९ नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली असून यातील ९७३ नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले तर ३५ नागरिकांची पुणे भारती विद्...

*हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार, अधिकृत घोषणा आज तर दिनांक ७ ऑक्टोबर रोजी मेळाव्याचे आयोजन, सूत्रांनी दिली माहिती*

इंदापूर, डॉ संदेश शहा. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील दिनांक ४ ऑक्टोबर रोजी तुतारी हाती घेणार असून याची अधिकृत घोषणा दिनांक ५ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत तर ७ ऑक्टोबर रोजी जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील यांनी ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली आहे. हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील तसेच कन्या तथा भाजप जिल्हा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ. अंकिता पाटील ठाकरे यांनी मोबाईल वर तुतारीचे स्टेटस ठेवून ते मोबाईल अकाऊंट वर पोस्ट केल्याने हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश निश्चित झाला आहे. यासंदर्भात हर्षवर्धन पाटील उद्या पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका जाहीर करणार आहेत. गेल्या आठवड्यात हर्षवर्धन पाटील यांनी वडापुरी ( ता. इंदापूर ) येथे काटी वडपुरी जिल्हा परिषद गट मेळाव्यात बोलताना पितृपंधरवड्यानंतर आपण तुम्ही जो आग्रह धरत आहात, तो निर्णय ...

*मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन*

पुणे, दि.३ : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्यावतीने ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत विविध साधने खरेदी करण्यासाठी निधी वितरण करण्यात येत असून लाभार्थ्यांनी ४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन वयोश्री योजनेचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे योनी केले आहे.  पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारिरीक असमर्थता, दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी सहायभूत आवश्यक सहाय साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी या योजनेअंतर्गत लाभ दिले जातात.  या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित होईपर्यंत या योजनेअंतर्गत निधीचे वितरण पात्र लाभार्थ्याच्या वैयक्तिक आधार संलग्न बॅकेच्या बचत खात्यात एकवेळ ऑनलाईन पध्दतीने करण्याऐवजी निधीचे वित...

*सणसर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न*

इंदापूर तालुक्यातील सणसर येथे माजी बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रवीण माने यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरास सणसरकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने सुरवात झाली. सणसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सकाळी १० ते ५ या वेळेत ७०३ नागरिकांनी नेत्र तपासणी करून घेतली असून यातील ४२७ नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले तर १८ नागरिकांची पुणे भारती विद्यापीठ येथे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.  गेले ४ दिवस तालुक्यातील विविध गावांतून हे नेत्र तपासणी शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न होत असून, संपूर्ण तालुकाच मोतीबिंदू आजार मुक्त करण्याचा निर्धार आपण केला असल्याचे प्रतिपादन यावेळी माने यांनी केले सणसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे हनुमंत जाधव, अतुल सूर्यवंशी व राहुल पवार यांनी आयोजन केले होते तर कार्यक्रमाची नियोजनाची जबाबदारी निलेश रंधवे, छगन बनसुडे व अंकुश दोरकर यांनी पार पाडली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनिकेत निंबाळकर, बजरंग रायते, अतुल सूर्यवंशी, सु...

*नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने फराळ व तेल वाटप संपन्न प्रवीणभैय्या माने मित्रपरिवाराच्या माध्यमातून मंडळांना नवरात्रीची भेट*

सालाबादप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सोनाई परिवाराचे संचालक तथा बांधकाम आरोग्य सभापती जिल्हा परिषद पुणे श्री प्रवीण माने यांनी तुळजापूरहुन आई भवानीची ज्योत घेऊन येणाऱ्या मंडळांची मनोभावे सेवा केली.  पुणे सोलापूर महामार्गावर आपला स्वागत कक्ष उभारून माने यांनी तुळजापूराहून भक्तीज्योत घेऊन येणाऱ्या विविध मंडळांच्या सदस्यांना दूध, फराळ, फळे, पाणी व ज्योतीसाठी तेलाचे वाटप केले.  नवरात्रीच्या पावन मुहूर्तावर तुळजापूरहून आई भवानीची ज्योत संपूर्ण रस्त्याने धावत आणने ही संपूर्ण इंदापूर तालुक्यातील विविध गावे व मंडळांची फार जुनी प्रथा आहे. या भाविकांची मनोभावे सेवा करून आपण यातूनच दरवर्षी ईश्वरसेवा साधत असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रविण माने यांनी केले.  महामार्गावर उभारण्यात आलेल्या या स्वागत कक्षाच्या माध्यमातून माने यांनी ३०० हून अधिक मंडळांचे याठिकाणी स्वागत केले व मंडळातील तब्बल ७००० सदस्यांना फराळ व पाण्याचे वाटप करण्यात आल्याचे सांगितले.