मुख्य सामग्रीवर वगळा

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याकडून शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य-हर्षवर्धन पाटील


इंदापूर : प्रतिनिधी दि.12/12/25
                                      कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टीलरी लि.कडून शेतकरी हितास सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. परिणामी, चालू गळीत हंगामामध्ये उच्चांकी रु. 3350 प्रति टन दर जाहीर करण्यात आला आहे. आता कारखान्याचा अडचणीचा काळ संपला असून, आगामी काळात कारखाना प्रत्येक वर्षी उच्चांकी ऊस दराची परंपरा कायम राखेल, असे गौरवोद्गार कारखान्याचे अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि. 11) काढले.
           महात्मा फुलेनगर (बिजवडी) ता. इंदापूर  येथे कारखाना कार्यस्थळावर आयोजित शेतकरी सभासद सुसंवाद कार्यक्रमामध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी उच्चांकी ऊस दर रु. 3350 दिलेबद्दल कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांचा सत्कार कारखान्याचे सभासद शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार यांच्या वतीने उत्साही वातावरणामध्ये करण्यात आला. प्रारंभी कर्मयोगी श्रद्धेय शंकररावजी पाटील उर्फ भाऊंच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नीरा भीमाच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, ओंकार ग्रुपच्या रेखाताई बोत्रे पाटील उपस्थित होत्या.
    हर्षवर्धन पाटील भाषणात पुढे म्हणाले, या कारखान्याच्या उभारणीसाठी सन 1985-86 च्या सुमारास कर्मयोगी भाऊंसमोरही अडचणी निर्माण करण्यात आल्या. तर सन 1995 ला मी आमदार होऊन राज्य मंत्रिमंडळात समावेश झालेवर तिसऱ्याच कॅबिनेटमध्ये कारखान्याला खास बाब म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी त्यावेळी रु. 9.50 कोटीचे शासकीय भांडवल मंजूर केले, त्यामधून कारखान्याचा विस्तार करण्यात आला. पुढे सन 2012 मध्ये चेअरमन म्हणून माझ्या खांद्यावर कारखान्याची जबाबदारी आली. सन 2012 ते 2014 पर्यंत काही अडचण नव्हती कारण आपण सरकारमध्ये सत्तेवर होतो. मात्र त्यानंतर दुर्दैवाने सन 2014, 2019 व 2024 ला राजकीय अडचणी आल्या. त्यावेळी विरोधक आमच्या संस्थांवर नाहक टीका करायचे. गेली 11 वर्ष आपल्याकडे राजकीय राजाश्रय नाही तरीही आपण डगमगलो नाही. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.
    पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माध्यमातून आमच्या कारखान्यांची आडवणूक करायची व दुसऱ्या बाजूला आमचेवर टीका करायची, अशी दुप्पटी भूमिका विरोधक घेत होते. तुंम्ही आमच्या कारखान्यावर कर्ज आहे अशी टीका करता मग तुमच्या कारखान्यावर 12 वर्षात 650 कोटी रुपयाचे कर्ज का केले. आपलं ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याच... या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी लोकप्रतिनिधींवर टीका केली. 
 नीरा भीमा कारखान्यास इथेनॉल कर्जासाठी  रु. 20 कोटी भरा मग रु. 50 कोटी कर्ज देऊ असे सांगितले. मात्र नंतर कर्ज न देता आडवणूक केली. नंतर बँकेने आम्हाला एक पत्र पाठवले, त्यात लिहिले आहे भविष्यकाळात नीरा भीमा कारखाना तोट्यात जाऊ शकतो म्हणून तुमचं कर्ज ना मंजूर करत आहोत. आता बँकेच्या अध्यक्षांनी कारखाना उत्कृष्टपणे चालू आहे ते पहावे.
   या बँकेवर तालुक्यातून दोन संचालक आहेत जे बिनविरोध जातात, आम्ही त्यांना तीन वेळा बिनविरोध केले. तुमची जबाबदारी नाही का? एन.सी.डी.सी. 8 टक्क्याने कर्ज देत असेल तर का जिल्हा बँक 11 ते 11.30 टक्के व्याज दर लावते, असे का, असे ते म्हणाले.
       हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापूर बाजार समिती निवडणुकीत सन 2017 ला तुंम्ही मतपत्रिका खाऊन निवडून आला. आता मत चोरी होते असे म्हणतात हे तर मतपत्रिका खाऊन 2 ते 3 मताने निवडून आले. नाहीतर आपल्याकडेच बाजार समिती राहिली होती.
मी म्हणून मंत्री असताना या बाजार समितीला खासबाब म्हणून पणन कडून सबशिडी दिली. फिश मार्केट केलं, ते फक्त एकाच इंदापूरच्या बाजार समितीत आहे, त्यासाठी कायदा बदलला. आज रत्नागिरी सिंधुदुर्ग पासून व्यापारी इंदापूर फिश मार्केटमध्ये येतात, हे आंम्ही उभा केलं. 25 एकर जागा आंम्ही बाजार समितीसाठी घेतली. आज बाजार समिती तुमच्या ताब्यात आहे, काय अवस्था आहे, डाळिंबाचं मार्केट बंद झाल.
   इंदापूर खरेदी विक्री  संघाची पाच दहा कोटीची प्रॉपर्टी आपण निर्माण केली. खरेदी विक्री संघात एक माणूस नोकरीस आहे, अशाप्रकारे संस्था तुंम्ही चालवताय. छत्रपती कारखाना तुम्ही चालवताय, अन आरोप मात्र दुसऱ्यावर करताय..असा टोला हर्षवर्धन पाटील यांनी विरोधकांना लगावला.
      पृथ्वीराजबापू जाचक अतिशय चांगला माणूस आहे. 22 वर्षे धुऊन खाल्ल्यानंतर आता बापूच्या गळ्यात भवानीनगर कारखाना घातलाय, तिथे अनावश्यक मोठ्या नोकर भरतीमुळे पगारावर कित्येक कोटी रुपये खर्च होत आहेत. राज्याचे नेतृत्व करणारी माणसं अशी वागायला लागली तर संस्था, शेतकरी याचे काय भविष्य राहणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
   यावेळी भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले की, साखरेचा दर प्रति किलोस रु. 41 करावा, अशी शिफारस राज्य शासनकडून केंद्र सरकारला करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मान्यता दिली आहे. तसेच भाषणात त्यांनी राज्य व देशातील साखर उद्योगातील समस्या व भविष्याचा आढावा घेतला. तसेच तालुक्यात येणाऱ्या भविष्यकाळात परिवर्तन झालेशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
      यावेळी बोलताना बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले, सहयोग तत्वावर कारखाना चालवण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांचा मोठा अभ्यास आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच कर्मयोगी कारखाना व ओंकार ग्रुप मध्ये शेतकरी हितासाठी सहयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला ऊस दर मिळत आहे. कारखान्यास शेतकऱ्यांनी चांगला प्रतीचा ऊस घातला पाहिजे, चांगले गाळप झाले पाहिजे. परिणामी, कोणीही आमचे एवढा चांगला ऊस दर देऊ शकणार नाही. कारखान्यात आपला सर्व ऊस द्या, आम्ही जास्तीत जास्त ऊस दर देऊ, असे आवाहनही भाषणात बाबुराव बोत्रे पाटील यांनी केले.
      यावेळी निरा भिमा कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी भाषणामध्ये बोलताना उच्चांकी ऊस दर दिलेबद्दल कर्मयोगी कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, बाबुराव बोत्रे पाटील यांचे अभिनंदन केले. दिलेल्या उच्चांकी ऊस दरामुळे श्रद्धेय भाऊंचे शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे, असे नमूद केले. नीरा भीमा कारखान्याचे चालू हंगामामध्ये 7 लाख मे. टन व कर्मयोगी कारखान्याचे 12 लाख मे. टन ऊस गाळपा उद्दिष्ट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील सर्व ऊस  या दोन्ही कारखान्यांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन भाग्यश्री पाटील यांनी याप्रसंगी केले.
    प्रास्तावित कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले. यावेळी राघव व्यवहारे, राजेंद्र पवार, निलेश देवकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास रेखाताई बोत्रे पाटील, राजवर्धन पाटील, लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे आदी मान्यवरांसह कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा कारखान्याचे संचालक, विविध संस्थांचे चेअरमन/व्हा. चेअरमन, पदाधिकारी, कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी सभासद, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.
-
----------------------------------
आंम्ही कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा या दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवाळीला रु. 100 प्रमाणे ऊस बिलाची रक्कम दिली. मात्र कृषी मंत्री असलेल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी छत्रपती कारखान्याच्या माध्यमातून दिवाळीला शेतकऱ्यांना ऊस बिल का दिले नाही? कृषीमंत्री असूनही तुम्हाला दिवाळीला शेतकरी का आठवला नाही? असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी केला.
---------------------------------
कर्मयोगी शंकररावजी पाटील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कर्मयोगी कारखान्याला व निरा भिमा कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी निरा भिमा कारखान्यास आपला सर्व ऊस देऊन, चांगल्या दरासाठी अधिकचे गाळप व्हावे म्हणून सहकार्य करावे. तसेच एकाही शेतकऱ्याचा ऊस हा गाळपाअभावी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी घाई करू नये, पिकाला एकादे पाणी दिले तरी चालेल, असे आवाहन या कार्यक्रमात भाषणांमध्ये हर्षवर्धन पाटील व बाबुराव बोत्रे पाटील यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जय भवानीगड विकास प्रतिष्ठान मधील बालचिमुकल्यानी घेतला आठवडा बाजाराचा आनंद

  इंदापूर जय भवानी गड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्या निकेतन स्कूल अ‍ॅण्ड जुनियर कॉलेज व प्रेसिडेंसी इंटरनॅशनल स्कूल, विद्या निकेतन कॉलेज ऑफ फार्मसी व विद्यानिकेतन इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05/12/2025 रोजी आठवडा बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.  विद्यार्थ्यांंना बाजारातल्या व्यवहाराची माहिती देण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी प्रशाले मध्ये आठवडा बाजार भरवला होता. बाजारातील खरेदी विक्रीची माहिती मिळावी, पैश्याचा वापर कसा करावा याची जाणीव असावी, या उद्देशाने या आठवडे बाजाराचे नियोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा पैश्याचे महत्त्व समजावे . भाजीपाला विक्री सोबत फळभाज्या विविध फळे, विविध खाद्यपदार्थ यांच्या खवय्यांनी विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.  फळे , भाजीपाला विक्री करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वहात होता.  बाजारातील उत्साह आणि लगबग पाहून संस्थेच्या उपाध्यक्षा चित्रलेखा ढोले यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. सदर कार्यक्रमा...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...