मुख्य सामग्रीवर वगळा

*केंद्र सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अन्यायकारक असल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर तहसील कचेरीवर आंदोलन*

इंदापूर 
  इंदापूर:- केंद्र सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अन्यायकारक असल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर तहसील कचेरीवर गुरुवारी (दि.२५) आंदोलन करण्यात आले.प्रसंगी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी चे उपाध्यक्ष भरतशेठ शहा,बापूराव जामदार, तालुका अध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील,अशोक घोगरे, शहराध्यक्ष ॲड.इनायतअली काझी, शकील सय्यद,कांतीलाल झगडे, सागर मिसाळ, अमोल मुळे, छाया पडसळकर, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, अशोक चव्हाण, गणेश महाजन, पी.पी पवार,निवास शेळके,  पुणे जिल्हाउपाध्यक्षा विजयाताई कोकाटे,रेश्मा शेख, तमन्ना शेख, सुनीता नरुटे, श्रीकांत मखरे, विकास खिलारे, सिकंदर बागवान, , अनिल ढावरे, अजय पारसे, अक्षय सुर्यवंशी, भारत यादव, नारायण वीर, दीपक गुरगुडे, उमेश ढावरे, युवराज सरक यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष ॲड.तेजसिंह पाटील म्हणाले की,अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी,कामगार,बेरोजगार,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त यांच्यासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आली नाही. हा अर्थसंकल्प देशवासियांची निराशा करणारा आहे. महाराष्ट्रातून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल जातो. भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिले. त्याचा राग, द्वेष मनात ठेवून भाजप प्रणित केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा पाठिंबा घेऊन एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेने महसूल कमी असताना ही आंध्र प्रदेश आणि बिहारला भरीव तरतूद करण्यात आली. त्यामुळे या दुटप्पी धोरणाचा जाहीर निषेध करतो. 

____________________________________________

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या ३१ जागा निवडून दिल्या. त्यामुळे केंद्र सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण व सर्वसामान्यांच्यासाठी कोणतीही बरीव तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले.
आप्पासाहेब जगदाळे.संचालक,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक.

__________________________________________

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे येथील भाजपच्या कार्यकर्त्या मेळ्यात बोलताना जे अनुद्गार काढले ते महाराष्ट्राच्या अभिमानाला, स्वाभिमानाला तसेच महाराष्ट्राला दुखावणारे होते. त्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या. स्वतः च्या राज्यातील परिस्थिती बिकट असताना पवार यांच्यावर खोटेनाटे आरोप केले. त्या सर्व आरोपांचा आणि वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. भाजपाचे नेते असेच बिनबुडाचे आरोप करीत राहिले तर जनक्षोभ आंदोलन करू.

ॲड. तेजसिंह पाटील, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.
_____________________________________________

टिप्पण्या