दत्त देवस्थान हे मनाला शांती देण्याचे केंद्र बनले आहे - नगराध्यक्षा अंकिता शहा,व शहा परिवाराच्या वतीने दत्त देवस्थानला महाभिषेक
इंदापूर(प्रतिनिधी): शहाजीनगर येथील दत्त देवस्थानमुळे हजारो भक्तगणांच्या मनाला शांती मिळते आहे.त्यामुळे मानवी जीवन जगण्यासाठी येथील क्षेत्र वरदान ठरणारे आहे.त्यामुळे मनाला शांती देण्याचे केंद्र दत्त देवस्थान झाले आहे.
असे गौरवोद्गार इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता मुकूंद शहा यांनी काढले.
श्री दत्त देवस्थान शहाजीनगर येथील दत्त जन्मोत्सवानिमित्त गुरुचरित्र अखंड हरिनाम सप्ताहातील मंगळवार(ता.१४ रोजी) श्रींची महापूजा तसेच महा अभिषेक इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिताताई मुकुंद शहा,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंदशेठ शहा,युवा उद्योजक निनाद शहा,त्यांच्या सुविद्यपत्नी सौ.पूर्वा निनाद शहा यांच्या हस्ते
पार पडला.सदगुरुची आरती व औदुंबर वृक्षाची पूजा निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.जी.गेंगे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.देवस्थानचे विश्वस्त व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी उपस्थितांचा सन्मान देवस्थानच्या वतीने केला.ह.भ.प.तुकाराम महाराज काळकुटे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव सागर शिंदे,प्रदिप विर,सोमनाथ मोहिते,माऊली सोलनकर, सतीश साठे,तिरुपती साठे यांच्यासह भक्तगण उपस्थित होते.
पुढे बोलताना नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या की,अनेक वर्षापासून गुरुचरित्र पारायण सोहळा दत्त देवस्थान मध्ये होत आहे.यामध्ये परिसरातील व तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात भाविक भक्तगण सामील होऊन हरिनामा ची परंपरा अखंड ठेवतात.दत्त देवस्थान हे या परिसराला वरदान ठरणारे देवालय आहे.ज्याच देवस्थानच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक उपक्रमामुळे भक्तगणांना मानसिक समाधान मिळते आहे.अशीही माहिती नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी दिली.
शहाजीनगर(तालुका इंदापूर)येथिल दत्त देवस्थान येथे महापूजा करताना इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा व मान्यवर.
टिप्पण्या