स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे यांची जयंती डाळज नंबर2ला साजरी
इंदापूर:-स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांची जयंती डाळज नंबर 2 तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी इंदापूर तालुका समस्त वंजारी समाज बांधव यांच्या वतीने डाळज नंबर 2 मधील समाजबांधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली भविष्यात मुंडे साहेबांचं समाज संघटनेचे असलेले स्वप्न पूर्ण करण्याचा मानस समाजातील समाजबांधवांनी यावेळी अमलात आणण्याचे ठरवले यावेळी विविध मान्यवरांची मनोगते झाली यावेळी प्रतिमा ची पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैवत फाउंडेशनचे अध्यक्ष भैय्यासाहेब पानसरे यांनी केले यावेळी मान्यवर म्हणून निमसाखर ग्रामपंचायतचे सदस्य व पुणे जिल्हा वंजारी सेवा संघाचे संपर्कप्रमुख पै शेखर पानसरे उपस्थित होते त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले साहेबांनी दिलेला मंत्र समाजाच्या विविध प्रश्नावर ते समाज बांधव एकत्र येण्याचा मानस यावेळी यांनी व्यक्त केला तसेच यावेळी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष दीपक खाडे कळस गावचे चे विकास दराडे व ओमकार ओमासे श्री.नानासो डोईफोडे,श्री.भगवान कदम ( मा.उपसरपंच)प्रदिप जगताप (सरपंच) संजय कुचेकर, गणेश पानसरे, सतिश पानसरे, अभिजित पानसरे, रामभाऊ सोंन्ने, विशाल जगताप,श्री. प्रमोद पानसरे,श्री.राजुभाऊ डोईफोडे, प्रविन डोईफोडे,किसन डोईफोडे, सुदाम पानसरे, दत्ता सोंन्ने, कुमार पानसरे, विकास चि अभिजीत मदने यावेळी अभिजीत पानसरे यांनी आभार मानले
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या