मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया A च्या इंदापूर तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या हस्ते संपन्न इंदापूर :-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पार्टीच्या इंदापूर तालुका संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष दिपक भाऊ निकाळजे यांच्या हस्ते नुकतेच सविधान दिना दिवशी संपन्न झाले, इंदापूर तालुकाध्यक्ष पदी शिवराज पवार तर इंदापूर शहराध्यक्ष अशोक देवकर यांची एकमताने निवड करण्यात आल दीपक भाऊ निकाळजे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गणेश दादा घुगे यांच्या सहीनिशी पदांचे वाटप करण्यात आले, यावेळी दिपक भाऊ निकाळजे म्हणाले की इंदापूर तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करून सामान्य जनतेच्या हक्कासाठी या संघटनेशी एकनिष्ठ राहून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी भविष्यात मोठी फळी उभा करू,इंदापूर तालुक्यातील जनसामान्य लोकांतून शिवराज पवार व अशोक देवकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.दिपक निकाळजे म्हणाले की, आज संविधान दिन आहे आणि या दिवशी मला आपल्या सर्वांना एक सांगायचं की, बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न आहे की समाज ...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

ऐतिहासिक इंदापूर तालुक्यात ऐतिहासिक किल्ला बनवणाऱ्या उद्धट येथील युवकांचे राजवर्धन पाटील यांनी केले कौतुक इंदापूर प्रतिनिधी-  दीपावलीच्या निमित्ताने उद्धट येथील युवकांनी ऐतिहासिक वारसा असणाऱ्या कलाकृतींचा अविष्कार किल्ल्याच्या रूपाने साकारलेल्या होता. निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी उद्धट येथे जावून युवकांनी साकारलेल्या ऐतिहासिक कल्पकतेचे भरभरून कौतुक करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन वाटचाल करण्याचे युवकांना त्यांनी आवाहन केले.  उद्धट येथील श्रीनिवास संतोष काळे व त्यांचे सहकारी स्वामी जगदीश कुंभार,शुभम संजय पवार,मयूर शिवाजी कारभोळ,अमोल अनिल कणसे यांनी किल्ले पन्हाळा - पावनखिंड - विशालगड किल्ला साकारला. राजवर्धन पाटील यांनी या युवकाकडून किल्ल्याविषयी ची माहिती घेऊन त्यांचे कौतुक केले.