इंदापूर: कोरोना जागतिक महामारीत भारतात विशेषतः महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत असतांना त्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागावर सुध्दा प्रचंड प्रमाणात ताण वाढला होता. अश्या परीस्थीतीत राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद पुणे कडुन आम्हाला कंत्राटी तात्पुरत्या स्वरुपात भरती करुन घेतले, सर्व कर्मचा-यांनी जिवाची तमा न बाळगता कोव्हिड-१९ रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर होऊन कार्य केले. अश्या परिस्थीतीत कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावात गावातील लोकांनी व नातेवाईकांनी वागणूकदिली.अश्या काळात कर्तव्य बजावले.
तरी सदर कोरोना काळातील कंत्राटी पध्दतीची नियुक्ती संपुष्टात येत असून आमचा
उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असुन आमच्या सर्वांना आरोग्य विभागातील रिक्त पदी नेमणूक करुनकायमस्वरुपी रोजगाराची संधी उपलब्ध करुन दयावी तसेच येणा-या कळात कोरोना लसिकरणासाठीप्रशिक्षण देऊन कामाची संधी दयावी आशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांना दिले असल्याची माहिती सर्व कोविड-१९आरोग्य कर्मचारी,
जिल्हा पुणे. महाराष्ट्र पुणे.यांनी दिली, या प्रमुख्य मागण्या त्यात मांडण्यात आल्या
१) कोव्हिड-१९ कर्मचा-यांना कायमस्वरुपी सेवेत रुजू करुन घेणे.
२) अंशकालीन कर्मचारी घोषीत करुन शासनाच्या विविध विभागातील जागा कोरोगा कर्मदा-
यांसाठी राखीव ठेवण्यात यावे. तसेच राष्ट्रीय मलेरीया प्रतिरोध कार्यक्रमा अंतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून किमान ९० दिवस
काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र वापर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी ५०% आरोग्य सेवेत यामध्ये
केला जातो . त्याचप्रमाणे कोव्हिड-१९ नियंत्रण कार्यक्रमातर्गत ज्यांनी कोव्हिड-१९ आरोग्य
कर्मचारी म्हणून कमीत कमी ९० दिवस ( तीन महिने ) असेल त्यांना शासनाने आरोग्य
विभागातील सर्व पदासाठी ५० % आरक्षण दिले पाहिजे.
४) हंगामी फवारणी सारख्या केंद्रशासनाच्या तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विभागात व इतर
विभागात जागा राखीव ठेवणे.
५) जो पर्यंत आरोग्य विभागातील भरती निघत नाही तो पर्यंत एन आर एच एम मध्ये सर्व कर्मचारी
यांचे शिक्षणाच्या आधारे रिक्त असणा-या पदावरती १००% समायोजन करुन घ्यावे आसे निवेदन
मा,मुख्यमंत्री साहेब,महाराष्ट्र राज्य मुंबई ..
मा. ना. अजीत पवार साहेब,उप- मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई . मा. ना. राजेशजी टोपे साहेब, आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई .मा. ना. दत्तात्रय विठोबा भरणे. राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा. मा . मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे.यांना दिल्या आसल्याचे ते म्हणाले.
टिप्पण्या