युवारत्न जिल्हा परिषद सदस्या अंकिताताई पाटील यांचा वाढदिवस शेटफळ करांनी केला आगळा वेगळा साजरा.श्रेयस नलवडे
इंदापूरःअंकिता पाटील यांचा वाढदिवस२६ डिसेंबर २०२० रोजी असून विविध कार्यक्रमाच्या नियोजनानुसार आज शेटफळ हवेली येथे युवारत्न अंकिता पाटील युवा मंच इंदापूर तालुका व ग्रामस्थ शेटफळ हवेली यांच्या माध्यमातून कु. अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या अभिष्टचिंतनना निमित्त पर्यावरण पूरक असा कार्यक्रम म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम अंकिता पाटील यांच्या हस्ते तसेच गावातील ग्रामस्थ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी गरजू ज्येष्ठ व्यक्तींना सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून थंडीच्या दिवसात उपयोगात येणारा ब्लॅंकेट याचे वाटप यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी हनुमंत शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच युवारत्न अंकिता पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आज शेटफळ हवेली येथे माझ्या युवा मंच इंदापूर तालुका व सर्व शेटफळ हवेली ग्रामस्थ यांच्यावतीने हा कार्यक्रमाचा सोहळा केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे.
त्या पुढे म्हणाल्या की , आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. कारण शेटफळ हवेली मध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या आणि समाजकारणाची वाटचाल सुरू झाली. त्या मंचावर माझा अभिष्टचिंतनाचा सोहळा हा सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षारोपण आणि ज्येष्ठ वृद्ध महिला व पुरुष यांना ब्लँकेट वाटप करून हा कार्यक्रम साजरा केला . खरंतर वाढदिवस साध्या पद्धतीने करावा . युवक कार्यकर्ता श्रीयश नलवडे व त्यांचे युवक मित्र परिवार, शेटफळ हवेली येथील सर्व युवक कार्यकर्ते, सर्व ग्रामस्थ यांनी खूप आपुलकीने हा कार्यक्रम आयोजित केला. त्यांचे मनःपूर्वक आभारी आहे . आपणा सर्वांच्या वतीने अशा चांगल्या कार्यक्रमाचा मेसेज आपल्याला समाजात देता आले. खरंतर वाढदिवस म्हटलं की आजच्या युवकांमध्ये वेगळाच दृष्टिकोन मनामध्ये असतो. सामाजिक बांधिलकी घेऊनच इथून पुढचे उपक्रम युवकांनी राबवावेत.
या वेळी अंकिता पाटील, म्हणाल्या की, आपण केलेले काम स्वतःसाठी न करता आपला गाव, तालुका, जन्मभूमी यासाठी चांगल्या पद्धतीने काम केले पाहिजे. अशा पद्धतीने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी युवा उद्योजक अमोलराजे इंगळे, निवृत्ती आबा शिंदे,हनुमंत आप्पा शिंदे,शिवाजी भाऊ शिंदे, सचिन शिंदे उपसरपंच,विजय सिंह कानगुडे ,श्रीयश नलवडे, सुयोग सावंत, ग्रा.स.नितीन चव्हाण, मयूर कांबळे ,शंकर चव्हाण,धनंजय शिंदे, सचिन दरेकर ,शिवाजी नवले ,तानाजी नरबट,शिवाजी साठे इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते
□□□□□□□□□□□□□□□□□□
या कार्यक्रमाच्या वेळी युवामित्र श्रीयश नलवडे हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आमच्या सर्वांच्या आणि तालुक्यातील युवकांमध्ये आदर्श व्यक्तीमत्त्व म्हणून युवारत्न व पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिताताई पाटील यांच्याकडे पाहिले जाते. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त अवांतर खर्च न करता प्रत्यक्ष मदत पोहोचेल असे कार्यक्रम ठेवले पाहिजे. म्हणून ज्येष्ठांना ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम केला. येणाऱ्या काळात आम्ही तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर अंकिताताई यांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू.
टिप्पण्या