इंदापूर :कांदलगाव येथील जमीन ही पद्माकर बाबर यांच्या मालकीची असून त्यांचे चुलत बंधू प्रवीण बाबर, चुलते गणपत बाबर, चुलत बंधू सचिन बाबर,व चुलती सुमन बाबर गेल्या पंचवीस वर्षापासून त्या जमिनीवर अतिक्रमण करत असून ती जमीन मालकी हक्काची असल्याचा दावा रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय सोनवणे यांनी इंदापूर येथे पत्रकार परिषदेत केला.ते म्हणाले की कांदलगांव ता.इंदापुर जि.पुणे.येथील मराठा कुटूंबातील गरिब शेतकरी पद्माकर बाबर यांची स्वताची जमीन कागदपत्रे असताना अनेक गुन्हे दाखल असलेला गुंडप्रवृतीचे प्रविन गणपत बाबर जिवे मारण्याची धमकी देऊन गेली 25 वर्ष गाळपेर नसलेली जमीन वहिवाट करत आहे यावर्षी पद्माकर बाबर यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी जमीनिची दोघांनाही कागदपत्रे घेऊन बोलावले तर प्रविन बाबर चर्चेला सुद्धा आले नाही पोलिसांनी पद्माकर बाबर यांची जमीनीची कागदपत्रे पाहून पद्माकरच्या तक्रारीवरून प्रविन वर 379 गुन्हा दाखल केला आहे, तो खोटा नाही पोलिसांनी सगळ्यांना चांगली वागणूक दिलेली आहे कुणावरही अन्याय केलेला नाही इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सारंगकर साहेबांचं काम अन्याय झाला तर त्याला न्याय देण्याच आहे, आणि ते न्याय देतात ज्यांच्या खोट्या केसेस साहेब घेत नाहीत ते साहेबांना बदनाम करण्याच काम करत आहेत पद्माकर ची जमीन
बळकावण्यासाठी दोन मुलांनी आईला थायमिट चे खडे खायला देण ही दुर्देवी घटना घडली आहे,असेही सोनवणे म्हणाले, पुढे म्हणाले की, त्यांचं गोष्टी चा दबाव टाकून जमिन मिळवण्याचा प्रयत्न आम्हाला दिसुन येत आहे लवकर आम्ही गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब यांना भेटून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे माहीती संजय सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिलीया वेळी पद्माकर पांडुरंग बाबर, व इतर कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले की ती जमीन पद्माकर बाबर यांच्या मालकीची असून तिच्यावर कोणत्याही प्रकारचे गायरान, वन विभाग, किंवा इतर हक्कात ती जमीन नाही, त्या जमिनीचा सातबारा हा पद्माकर यांच्या नावावर असून त्यावर गेली पंचवीस वर्ष बाबर कुटुंब दहशतीने अतिक्रमण करत आहेत.
यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले की यामध्ये विनाकारण महिलांना पुढे करून इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे,तसेच प्रवीण बाबर व त्याचे कुटुंबीय हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून यापूर्वी त्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे विविध ठिकाणी दाखल आहेत, दबावाच्या व दहशतीच्या जोरावर पंचवीस वर्ष पद्माकर यांच्या मालकीच्या जमीनीवर ते अतिक्रमण करत आहेत, आता पद्माकर याला जमीन मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा यावेळी सोनवणे यांनी दिला.हा कार्यक्रम सोशलडीस्टन्स ठेवून सॅनिटायझ व मास्कचा वापर करून पार पडला,
टिप्पण्या