इंदापूर: क्रिकेट मुळे मन आणि शरीर तंदुरुस्त होते,जीवनातील ताण तणाव सुद्धा यामुळे कमी होण्यास मदत होते म्हणून जीवनात खेळास अनन्यसाधारण महत्व असते असे मत लोकप्रिय जि प सदस्या युवारत्न अंकिताताई हर्षवर्धनजी पाटील यांनी व्यक्त केले.गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब इंदापूर यांनी अंकिताताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.
या वेळी गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब चे त्यांनी विशेष कौतुकही केले कारण गेल्या 4 वर्षांपासून विविध क्षेत्रातील लोक एकत्र येऊन दररोज सकाळी अखंडितपणे क्रिकेट खेळत आहेत, यातून समाजातील एकात्मता वाढण्यास मदतही होते असेही त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी राधा-कृष्ण हॉटेल मध्ये माजी नगरसेवक गोरखभाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत युवारत्न अंकिताताई पाटील यांचा सत्कार करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्यावतीने वाढदिवसानिमित्त राधिका नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब मधील सदस्य हे विविध राजकीय पक्षातील, व्यापारी, पोलिस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील आहेत. हे सर्व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून क्रिकेटचे सामने व सामाजिक उपक्रम राबवत असतात. विशेष म्हणजे विविध पक्षातील कार्यकर्ते - पदाधिकारी असले तरी सामाजिक उपक्रम एकत्रित राबवतात . या गोष्टीचा मला अभिमान आहे असेही त्या म्हणाल्या.
गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब दरवर्षी मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे सामने भरवीत असतात गेल्या वर्षी भारताचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण यास बक्षीस वितरण करण्यास आणले होते याचीही आठवण युवारत्न अंकिताताई पाटील यांनी काढली.त्याच प्रमाणे फेब्रुवारी महिन्यात भरविण्यात येणाऱ्या डे-नाईट सामन्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीयश नलवडे यांनी केले तर सूत्रसंचालन भाऊसाहेब शिंदे यांनी केले.कार्यक्रमास आभार माजी नगरसेवक गोरखभाऊ शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित सदस्यांमध्ये गोरखभाऊ शिंदे,भाऊसाहेब शिंदे,सागर गानबोटे,श्रीयश नलवडे,अनिल अण्णा पवार, संजय शिंदे (डोनाल्ड),सुनील गुळूमकर,नितीन रणवरे,बापू काळे, दत्तात्रय घाडगे, संजय सानप,उदय शेठे,निलेश केदारने,निलेश मनाले, किरण घाडगे,बालाजी आडसुळे,संभाजी सूर्यवंशी,विदेश कांबळे, अंकुश चव्हाण, विजय भापकर, नाना शिंदे, सागर साळुंखे,रोहित शिंदे,प्रवीण सातपुते,विनोद हरणावळ,सुनील सिद्धापुरे,अनिल सिद्धापुरे,सौरभ किर्वे इत्यादी युवक उपस्थित होते .
टिप्पण्या