मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव, शिवसृष्टी न्यूज

 

इंदापूरःव्यंकटेशपार्क..... आज व्यंकटेश नगर येथील पुरातन बालाजी मंदिर नाजिक ची कोरडी पडलेली  विहीर... जेथे दिड दोन वर्षा पूर्वी या कोरड्या विहिरी मध्ये   परिसरातील नागरिक बंधु भगिनी कचरा टाकत होते.कचऱ्याने विहीर जवळ जवळ गच्च भरलेली असायची त्यामुळे येथे दुर्गंधी असायची नगरपरिषदेचे आरोग्य विभागातील कर्मचारी तो कचरा वारंवार उचलून घ्यायचे पण...  परत येरे माझ्या मागल्या नुसार पुन्हा नागरिक घंटा गाडी त्या परिसरातून कचरा संकलन करत असून ही घरातील ओला सुका कचरा वेगळा न करता घंटा गाडीत कचरा न देता त्या विहिरी मध्ये कचरा टाकत आणि ती विहीर पुन्हा कचऱ्याने भरून जात.कधी कधी कोणीतरी हा कचरा पेटवून देत मग परिसरात धूर मग याच परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास.पण कोणाला त्याचे काही घेणे ना देणे..पुन्हा पुन्हा कचरा पडतच राहीचा.मग यावर उपाय म्हणून मा.सौ.नगराध्यक्षा अंकिता ताई शहा आणि तत्कालीन  मुख्याधिकरी मा.श्री.झंवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली असे ठरले की हा कचरा आता भरून घेऊ आणि या विहिरीत काळी माती भरून येथे फुल झाडे लावू जेणे करून येथे कचरा टाकणारे कचरा टाकताना स्वतः लाजतील परिणामी कचरा वेगळा करून घंटा गाडीत देतील.
येथे लावलेली झाडे वाढतील तेंव्हा याच परिसरातील नागरिक लहान मुले येथे रमतील गमतील विश्रांती घेतील थोडक्यात येथे छोटासा बगीचा तयार होईल.मग काय ठरले आणि स्वतः नगराध्यक्ष मा.सौ.अंकिताताई शहा मुख्याधिकरी मा.श्री.झंवर साहेब यांनी विहिरीतून कचरा उचलण्यास सुरुवात केली त्यांची ही कृती पाहून आमच्यामध्ये  स्फुरण चढले आणि आरोग्य विभागातील कर्मचारी व नगरपरिषद सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी जोमाने काम करू लागले आणि बघताबघता विहिरीतील सर्व कचरा उचलण्यात येऊन ती विहीर एकदम स्वच्छ चकाचक झाली.त्या नंतर सर्वांनी तेथेच चहा नाष्टा केला.त्यानंतर त्या विहिरी मध्ये काळी माती भरून वृक्षा रोपण करण्यासाठी
श्री.मुकुंद शेठ शहा यांनी त्यांचे नर्सरी मधील झाडांची रोपे विनामोबदला उपलब्ध करून  दिली त्यामुळे तेथे छोटा बगीचा तयार होण्यास मदत झाली...आणि त्याच *व्यंकटेश पार्क* म्हणून नामकरण ही झालं.आज  दत्तजयंती च्या निमित्ताने  त्याच छोट्याशा व्यंकटेश पार्क मध्ये माझा छोटा पुतण्या सार्थक , याला घेऊन गेलो त्याला माहीत होते आबा येथे घेऊन आले आहे म्हणजे एक तर झाडे लावायची आहे किंवा झाडांना तरी पाणी द्यायचे असणार.कारण यापूर्वीही त्याला येथे घेऊन येऊन झाडांना पाणी दिले होते.बऱ्याच दिवसांनी ती झाडे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले आणि म्हणाला केवढी मोठी झाली आहेत झाडे. आता आम्ही खाली आलो मी लीलाचंद,कर्मचारी राहुल जाधव,सौ. लक्ष्मीबाई साळुंके,आणि मामा तेथील गवत वाळलेली पाने उचलून झाडांना आळी करत बसलो तोवर सार्थक म्हणाला तुमचे काम होईपर्यंत मी झाडांना पाणी देतो आणि त्याने झाडांना पाणी देण्यास सुरुवात केली.तेवढ्यात त्याच्या वर्गातील यापरिसरत राहणारे त्याचे दोन मित्र आले आणि एकमेकांना सांगू लागले अरे आपल्या वर्गातील चिंचकर आलंय चला खाली आणि ती मुलं विहिरीत खाली आली आणि मला म्हणाली आम्हीपण देऊ का झाडांना पाणी ,झाडांना आळी पण करू का ? मग मी पण त्यांना होकार देताच ती पण लागली कामाला.हेतू एवढाच की  त्यांना पण  झाडांबद्दल प्रेम माया उत्पन्न झाली पाहिजे त्यांना सुध्दा समजल पाहिजे की झाडांपासून आपल्याला काय काय मिळते ते आपल्या किती उपयोगाचे आहे त्याची आपल्याला किती मदत मिळते.मग त्यासाठी आपण झाडाची कशी निगा राखली पाहिजे त्याला कसे जोपासले पाहिजे  माझा एवढाच उद्देश होता. त्यामुळे मी कधी कधी माझा पुतन्या सार्थकला वेळ मिळेल तेव्हा बरोबर घेऊन जाताना त्याला कचरा  झाडांबद्दल प्लास्टिक बद्दल माहिती देतो व आपल्या सभोवताली राहणाऱ्या गोरगरीब मुला मुलींची माहिती देऊन त्यांना कशी मदत करावी त्यांच्याशी कसे वागावे याच प्रात्यक्षिकच करून दाखवतो.म्हणतात ना की बाल मनावर आपण जसे संस्कार करतो तसे त्यांच्या मनावर संस्कार होतात अगदी त्यासाठीच तस हे सर्व त्याच्या समोर हे घडवतो जेणे करून त्याच्या लवकर पण पक्क लक्ष्यात राहावं हाच माझा हेतू असतो. उदाहरणार्थ तीन मार्च रोजी त्याचा वाढदिवस असतो मी माझ्या वाढदिवसाला एक तरी झाड लावतोच हे त्याला माहिती होते त्यामुळे त्यांनी सुद्धा घरी एका पत्र्याच्या डब्यामध्ये खाल्लेले जांभळाचे बी टाकून त्यापासून त्यांनी एक  रोप तयार केले स्वतःच त्याला पाणी देऊन निगा राखून त्याला थोडे मोठे झाल्यावर कचरा प्रक्रिया केंद्र येथे तीन मार्च 20 रोजी त्याच्या वाढदिवसा दिवशी तेच त्यांनी जोपासलेले जांभळाचे रोप घेऊन त्या ठिकाणी लावले अधून-मधून त्याला त्या झाडाचे आठवण आली की तो माझ्याबरोबर त्या ठिकाणी येतो. लावलेल्या झाडाला पाहून फोटो काढतो आणि मग नकळत त्याच्या तोंडून वाक्य निघत माझ्यापेक्षा किती मोठं झालाय झाड.आता त्याला कळू लागलं आहे ओल्या कचऱ्याचे सुक्या कचऱ्याचे काय होत.प्लॅस्टिकचा वापर केला तर त्याचे काय काय दुष्परिणाम परिणाम होतात.कोणता कचरा कुजतो कोणता कुजत नाही.कापडी  पिशव्यांचे परिणाम का महत्वाचे आहेत. बरेच प्रश्न विचारत असतो तो मी सुद्धा मला जमतील तेवढे त्याला उत्तरे देतो.
 पण खरी उत्तरे देतो त्याला सुद्धा पुढे कदाचित भविष्यात त्याचा उपयोग होईल किंवा त्याच्या विचारांमध्ये भर पडेल. माहीत नसेल तर नाही म्हणून सांगतो पण खोटी माहिती देत नाही त्याला.आमच्या घरात सर्वात लहान बाळ म्हणजे तोच आहे आणि सर्वांचा लाडका पण.. कामावरून घरी आल्यावर त्याच्याशी गप्पा मारताना नगरपरिषदेच्या वतीने आज काय काय कार्यक्रम घेतले कायकाय केले सर्व माहिती देतो.मग त्याचा ठरल्या नुसार प्रश्नोत्तराचा तास. मज्ज्या येते.दिवसभराचा ताण जातो त्याच्या बरोबर गप्पा गोष्टी केल्याने. कधी चिढ ला घालवायचे रुसला तर जवळ घेऊन रुसवा काढायचा मग काय तरी लाडी गुडी लावायची आणि त्याला बोलता करायचा आणि काहीतरी खुळ काढून त्याला हसवायचे. त्यामुळे त्याचा माझ्यावर खूप विश्वास आहे. आज घरी आल्यानंतर हात-पाय-तोंड साबणाने स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता मला म्हणाला आज मला कुठेतरी बाहेर गावी फिरायला गेल्यावर वाटत तस मस्त वाटल लईच भारी मज्जा आली.तुमच्या नगरपालिकेचे वसुंधरा अभियान चालू आहे. तुम्ही सगळेजण रोज झाडे लावताना व्हॉटसअप वर दिसता मी पण उद्या तुमच्याबरोबर झाडे लावायला येतो मला उद्या पण घेऊन चला. मला पण बरं वाटतं त्याचा उत्साह पाहून. तेवढ्यापुरतं त्याला काहीतरी कारण सांगून हो म्हणायचं पण सध्या कोरोना व्हायरसमुळे मी त्याला जास्त गर्दीच्या ठिकाणी बाहेर घेऊन जाऊ शकत नाही. ही खंत पण मनाला होते. मग *असं कधीतरी त्याला घेऊन जायचं... त्याचं मन रमवायचं... आणि त्याचं निसर्गाशी नातं जोडायचं...*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते