इंदापूर: जिल्हा परिषद सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या (इस्मा) कायदेशीर उपसमितीच्या सहअध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इंदापूर, नंदकिशोर प्रगती विद्यालय सराफवाडी, श्री. नानासाहेब केरबा व्यवहारे विद्यालय शिरसोडी, उत्कर्ष विद्या मंदिर कालठण नंबर 1, महात्मा फुले विद्यालय बिजवडी, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर, कला महाविद्यालय भिगवन याठिकाणी वृक्षारोपण तसेच निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , संस्थेचे उपाध्यक्ष पद्मा भोसले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तसेच असे सामाजिक उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी असतात अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
कोरोना पार्श्वभूमी असल्याने अंकिता पाटील यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी तसेच पर्यावरण संवर्धनासारखे उपक्रम घेण्याचे आवाहन केले होते. तसेच इंदापूर तालुक्यामध्ये 5000 वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता. तालुक्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयाने या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला.
विद्यार्थी, युवक युवतींचा सहभागाबरोबरच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने तसेच विविध स्पर्धेच्या माध्यमातून सहभाग घेतल्याने आनंद झाल्याची प्रतिक्रिया अंकिता पाटील यांनी यावेळी दिली.
श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इंदापूर चे मुख्याध्यापक विकास फलफले, नंदकिशोर प्रगती विद्यालय सराफवाडी चे मुख्याध्यापक एन. आर .मोमीन, श्री. नानासाहेब केरबा व्यवहारे विद्यालय शिरसोडी च्या मुख्याध्यापिका झेड. टी. घाडगे, उत्कर्ष विद्या मंदिर कालठण नंबर 1 च्या मुख्याध्यापिका ए. ए. सर्जेराव ,महात्मा फुले विद्यालय बिजवडी चे मुख्याध्यापक शिवाजी कांबळे, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर चे प्राचार्य डॉ. संजय चाकणे उपप्राचार्य प्रा.नागनाथ ढवळे, कला महाविद्यालय भिगवन चे प्राचार्य डॉ.महादेव वाळुंज तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला.
टिप्पण्या