शेकडो तक्रारी होवून सुध्दा सारंगकरांवर कारवाई होत नाही,त्यांना वरदहस्त कोणाचा-अॅड राहुल मखरे
इंदापूर :पोलिस स्टेशनचे पी.आय सारंगकर व त्यांचे पोलिस स्टेशनचे २/३ सहकारी यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला व्यक्तीगत धंद्याचा आड्डा बनवून सर्वसामान्य लोकांची गेल्या ८ ते ९ महिन्यापासून छळवणूक सुरू केली आहे. इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावातील सर्वसामान्य लोकांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. खरे गुन्हे दाखल
करून घेतले नाहीत.अशी माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव अॅड राहुल मखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली या वेळी प्रविण बाबर, गणपत बाबर, उपस्थित होते, त्या नंतर बोलताना राहूल मखरे म्हणाले की,१) काटी येथील एका प्रकरणात फॅक्चरचे मेडिकल सर्टिफिकेट असताना ३२६ ऐवजी ३२४ कलम लावून गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन होण्यासाठी मदत केली होती.
२) बळ पुडी व इंदापूर येथील देवकाते - करे यांच्यावर खोटा ३०६ चा गुन्हा दाखल करून त्यांना अनेक दिवस तुरूंगात ठेवले.
३) बेडशिंग येथील बन कुटुंबियांचा छळ केला.
४) इंदापूर शहरातील गोरगरीब, भटक्या-विमुक्त लोकांना मारहाण करून धमक्या दिल्या.
५) प्रतिष्ठित लोक, व्यापारी यांना शिवीगाळ करून, अपमान करून हाकलून दिले.
६) प्रविण बाबर यांच्या वरती खोटा ३७९ गुन्हा दाखल केला. त्याच्या आई व पत्नीला अश्लील शिवीगाळ करून त्यांनाआत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
७) गागरगाव प्रकरणात निदीष लोकांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर चुकीचा तपास करून आरोपींना मदत केली
अशा शेकडो तकारी आहेत ज्यामध्ये ख-याचे खोटे व खोट्याचे खरे गुन्हे दाखल करून लोकांना त्रास दिला आहे.संबंधित अन्यायग्रस्त लोकांनी पोलीस महासंचालक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे वारंवार लिखित तकारी केल्या आहेत.परंतु,
पी. आय सारंगकर व त्यांच्या सहका-यांवर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. यामध्ये मंत्री महोदयांचा वरदहस्त आहे की
पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण या भ्रष्ट अधिका-याला वाचवत आहेत हा प्रश्न सर्व सामान्य लोकांना पडला यासंदर्भात सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी व सर्व अन्यायग्रस्त लोकांना एकत्र करुन त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती आसे अॅड. राहुलजी मखरे राष्ट्रीय महासचिव , बहुजन मुक्ती पार्टी म्हणाले
टिप्पण्या