इंदापूरः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा सरचिटणीस पदी वसंतराव आरडे यांची निवड करण्यात आली. (दि. २२) रोजी लोणावळा येथे झालेल्या पक्षाच्या एकदिवसीय शिबिरामध्ये त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले.
या निवडीनंतर वसंतराव आरडे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, खा. सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील तसेच राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांसह सर्वच पक्षश्रेष्ठींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे कार्य व ध्येय धोरणे तळागाळातील घराघरात पोहचवण्यासाठी रात्रंदिवस तत्पर राहणार आहे तसेच सार्वजनिक कामांमध्ये भाग घेऊन लोकांना मदत करणे तसेच पक्ष संघटना मजबूत करुन पक्ष बांधणी चे काम करण्यासाठी अमुल्य योगदान देणार असल्याचे नूतन सरचिटणीस वसंतराव आरडे यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा युवकाध्यक्ष सचिन पोटकुले, युवती जिल्हाध्यक्षा पुजा बुट्टे- पाटील, इंदापूर तालुकाध्यक्ष हणुमंतराव कोकाटे तसेच जिल्ह्यातील पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
====================================
टिप्पण्या