इंदापूरः तालुक्यातील कांदलगाव येथील प्रवीण बाबर डॉ. सचिन बाबर आणि संबंधितावर 395 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात इंदापूर पोलिस स्टेशन समोर २०/१२/२०२० रोजी पासुन बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय भैया सोनवणे यांनी निवेदनाद्वारे दिली.
या वेळी बोलताना सोनवणे म्हणाले की,
कांदलगाव तालुका इंदापूर येथील येथील प्रवीण गणपत बाबर व कुटुंबातील व्यक्तीवर अन्यायग्रस्त पद्माकर बाबर यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावर कारवाई करण्यात यावी,डॉ. सचिन बाबर यांना तात्काळ अटक करावी डॉ. सचिन बाबर,यांनी सौ. सुमन बाबर, यांना अकलूज येथे हलवले त्या हॉस्पिटलची सखोल चौकशी करण्यात यावी, आईला औषध दिले म्हणून व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून 309 चा गुन्हा दाखल करण्यात यावा व आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा असून संबंधित सुमन बाबर यांच्यावरही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हे दाखल करण्यात यावे कांदलगाव येथील सरपंच रविंद्र पाटील यांनी बेकायदेशीरपणे गुंड प्रवीण बाबर यांना जमीन तुमचीच आहे, असा महसूल विभागाचा अधिकार नसताना दाखला देऊन बाबर विरुद्ध बाबर असा वाद वाढवल्यास जबाबदार धरून फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी सरपंच पद रद्द करण्यात यावे, कंदलगाव येथील अनेक कुटुंबावर या प्रवीण बाबर व त्यांच्या कुटुंबीयांनी पद्माकर बाबर सारखीच जमीन बळकावने अन्याय केलेला आहे प्रशासनाने चौकशी करून त्यांना न्याय देण्यात यावा इंदापूर पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावरील आरोप सर्व आरोप बिनबुडाचे व खोटे आहे सर्व मागण्या मान्य होईपर्यंत इंदापूर पोलीस स्टेशन समोर पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे संजय भैय्या सोनवणे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांनी ही माहिती दिली या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे जिल्हाधिकारी पुणे पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तहसील कचेरी इंदापूर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन इंदापुर जिल्हा पुणे यांना पाठवून दिली असल्याचे सोनवणे यांनी सांगितलं,या वेळी पद्माकर पांडुरंग बाबर व अनेक कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते,
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या